ED Moved In Court: पाच समन्स पाठवूनही केजरीवालांनी दिला नाही भाव, ईडीची थेट दिल्ली कोर्टात धाव

Arvind Kejriwal : दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांसमोर अखेर अधिकाऱ्यांनी टेकले हात
ED summons to Arvind Kejriwal
ED summons to Arvind KejriwalSarkarnama
Published on
Updated on

News Delhi Politics : संपूर्ण देशात विविध राज्यात ईडीच्या छापेमारीच्या घटना आणि समन्स तसेच अटक सत्र सुरूच असते. दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना देखील आतापर्यंत पाच समन्स ईडीने पाठविले. केजरीवाल यांनी ईडीचे समन्स स्वीकारले नाही. त्यामुळे आता समन्स पाठवून थकलेल्या ईडीने अखेर दिल्ली न्यायालयात धाव घेतल्याची माहिती समोर येत आहे.

ईडीची पीडा अनेक राजकीय नेत्यांना होत आहे. त्यामुळे अनेक नेते हे कारागृहात गेले आहेत. पण ‘आप’चे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मात्र सर्वांना त्रस्त करणाऱ्या ईडीला चांगलीच पीडा दिली असून त्यामुळे ईडी न्यायालयात गेली आहे.

ED summons to Arvind Kejriwal
Enforcement Directorate : 'ईडी'ने वाढविल्या अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी...

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मद्य धोरणाविरोधात पाचवे समन्स घेण्यास नाकारल्याची माहिती समोर येत आहे. इतकेच नाही तर ईडीच्या चौकशी अधिकाऱ्यांसमोर अरविंद केजरीवाल हजर झाले नाहीत. दिल्ली मद्य धोरणात मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीने काढलेल्या समन्सचे पालन न केल्याबद्दल अंमलबजावणी संचालनालयाने शनिवारी (ता. चार) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात दिल्ली न्यायालयात धाव घेतली. दिल्ली मद्य उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे ईडीच्या चौकशी पासून स्वतःला विविध कारणे समोर करत दूर ठेवत आले आहेत.

‘आप’च्या सात आमदारांना प्रत्येकी 25 कोटी देण्याची तयारी भाजपाची असल्याचे सांगत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या महिन्यात खळबळजनक वक्तव्य केले होते. त्यानंतर भाजपा आणि ‘आप’ यांच्यात दिल्लीत सुप्त संघर्ष आता रस्त्यावर आला आहे. दिल्लीत दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते नुकतेच आमने-सामने आले होते. दिल्लीतील ‘आप’चे सरकार पाडण्याचा भाजपाचा डाव असल्याचा आरोप आप ने केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात मद्य धोरण प्रकरणी ईडीने शनिवारी दिल्लीच्या कोर्टात तक्रार दाखल केली आहे. ईडीने न्यायालयाला सांगितले की, पाच वेळा समन्स बजावल्यानंतरही केजरीवाल हजर झाले नाहीत. 7 फेब्रुवारीला कोर्टात आता या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. तोपर्यंत अरविंद केजरीवाल यांना दिलासा मिळेल काय? अशी चर्चा होत आहे.

दिल्लीत ‘क्राईम ब्राँच’च्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना व्यक्तीशः समन्स देण्याचा प्रयत्न केला. पण, तो हाणून पाडण्यात आला. ईडी कुठल्या आधारावर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना समन्स पाठवित आहे, असा प्रश्न ‘आप’ने केला आहे. ‘आप’चे संजय सिंग यांनी ईडीवर सरकारी पुरावा देणाऱ्यांचा पुरावाच नष्ट केल्याचा आरोप केला.

ED summons to Arvind Kejriwal
Arvind Kejriwal : इंडिया आघाडीत फूट? अरविंद केजरीवाल यांच्या 'या' दाव्याने खळबळ...

केजरीवाल अनुपस्थिती प्रकरणात ईडीने अखेर दिल्ली न्यायालयात दार ठोठावले असून या प्रकरणात 7 फेब्रुवारी रोजी स्थानिक न्यायालय काय भूमिका घेते याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. दिल्ली मद्य धोरणाच्या प्रकरणात अरविंद केजरीवाल यांची चौकशी होते की नाही, त्यांना अटक होते काय? या विषयी अनेक तर्क राजकीय पातळीवर लावले जात आहेत.

Edited By : Prasannaa Jakate

ED summons to Arvind Kejriwal
Arvind Kejriwal News: अरविंद केजरीवाल यांना अटक होणार? आपच्या गोटात हालचालींना वेग

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com