New Delhi News : एकीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना जवाहरलाल नेहरू विद्यापीठातही विद्यार्थी संघाची निवडणूक (JNU Election Results) ऐतिहासिक ठरली. या निवडणुकीत भाजपशी संबंधित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा सुफडा साफ झाला आहे. विविध संघनांनी एकत्रित येत स्थापन केलेल्या पॅनेलचा दणदणीत विजय झाला असून, अध्यक्षांसह सर्व प्रमुख पदे मिळवली आहे. या विजयानंतर भारत माता की जय, लाल सलाम आणि जय भीमच्या घोषणांनी विद्यापीठ दणाणून गेले. तीन दशकांनंतर विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदी दलित विद्यार्थ्याची निवड झाली आहे.
विद्यापीठात युनायटेड लेफ्ट पॅनेल (ULP) आणि एबीव्हीपीमध्ये (ABVP) सरळ लढत झाली. रविवारी उशिरापर्यंत सुरू असलेल्या मतमोजणीमध्ये सुरुवातील एबीव्हीपीचे उमेदवार आघाडीवर होते. त्यामुळे एबीव्हीपी बाजी मारणार, असे चित्र सोशल मीडियात (Social Media) निर्माण झाले होते. पण मतमोजणी जसजशी पुढे गेली, तसे विरोधी पॅनेलच्या उमेदवारांनी मोठी आघाडी घेत विजय मिळवला. (JNU Students Union Election)
विद्यापीठाच्या (JNU) अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनचे (AISA) धनंजय यांनी 2 हजार 598 मतं मिळवत अध्यक्षपदाचा गुलाल उधळला. त्यांनी एबीव्हीपीच्या उमेदवाराला 1 हजार 676 मतं मिळाली, तर स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे (SFI) अविजीत घोष यांनी उपाध्यक्ष, बिरसा आंबेडकर फुले स्टुडंट्स असोसिएशनच्या (BAPSA) प्रियांशी आर्यांनी महासचिव आणि संयुक्त सचिवपदी मोहम्म साजित यांनी विजय मिळवला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
बारा वर्षांत पहिल्यांदाच सर्वाधिक मतदान
विद्यापीठामध्ये शुक्रवारी विद्यार्थी संघाच्या निवडणुकीसाठी (Election) मतदान झाले. या वेळी ही निवडणूक ऐतिहासिक ठरली आहे. मागील बारा वर्षांत पहिल्यांदाच सर्वाधिक मतदान झाले. यामध्ये 73 टक्के मतदारांनी सहभागी घेतला होता. या निवडणुकीत युनायटेड लेफ्ट पॅनेलमध्ये AISA, डेमोक्रेटिक स्टुडंट्स फेडरेशन, एसएफआय, एआय़एसएफ या संघटनांचा समावेश होता.
तीन दशकांनंतर पहिला दलित अध्यक्ष
विद्यापीठात तीन दशकांनंतर विद्यार्थी संघाचा अध्यक्ष म्हणून दलित विद्यार्थ्याची निवड झाली आहे. त्यामुळे धनंजय यांच्या विजयानंतर विद्यापीठात भारत माता की जय, जय भीम, लाल सलामच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच निळे, लाल झेंडे फडकावण्यात आले.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.