
Dombivli: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार आठवड्यात जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर ठाणे जिल्ह्यात पक्ष प्रवेशांची मालिका सुरू झाली आहे. पालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपने ठाणे जिल्ह्यातील शहराध्यक्षांना हटवून त्यांच्या जागी नवीन शहराध्यक्षांची नियुक्ती केली आहे. नंदू परब हे भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष व आमदार रवींद्र चव्हाण यांचे जवळचे मानले जातात.
भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कल्याण डोंबिवलीमध्ये कल्याण जिल्हाध्यक्ष पदावरून नाना सूर्यवंशी यांना हटवून त्या जागी नंदू परब यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी येताच कल्याण डोंबिवली मध्ये भाजपचा महापौर बसणार यासाठी प्रयत्न करणार असल्याचा निर्धार नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष नंदू यांनी केला.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने कल्याण डोंबिवलीत देखील पदाधिकाऱ्यांचे फेरबदल केले आहेत. भाजप पदाधिकारी व भाजप प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे खंदे समर्थक नंदू परब यांची कल्याण जिल्हाध्यक्षपदी भाजपकडून नेमणूक करण्यात आली आहे.
जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर नंदू परब यांनी भाजप कार्याध्यक्ष चव्हाण यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप पदाधिकाऱ्यांचे आभार मानलेत. पक्ष संघटनेसाठी पक्ष वाढीसाठी काम करणार असून येत्या महापालिका निवडणुकीत महापौर महायुतीचाच बसेल आणि तो भाजपाचाच असेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचा निर्धार नंदू परब यांनी बोलून दाखवला.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीत राजकीय पक्षांकडून कंबर कसण्यात आली आहे त्यातच भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी महापौर हा भाजपाचा असेल असा दावा केल्याने आता राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार या पक्षांच्या महायुतीचा ठाणे जिल्ह्यात वरचष्मा राहिला.लोकसभेच्या 2 तर विधानसभेच्या 16 जागा महायुतीने जिंकल्या. यामध्ये भाजपचे 9 तर शिवसेनेचे 6 आमदार आहेत. या दोन्ही पक्षांची जिल्ह्यात मोठी ताकद आहे. असे असले तरी, महापालिका निवडणुका तिन्ही पक्ष महायुतीत लढणार की स्वतंत्र लढणार याविषयी वेगवेगळे अंदाज वर्तविले जात आहेत.
जिल्ह्यात इतर पक्षातील माजी नगरसेवकांना गळ लावत आपल्या पक्षात प्रवेश देण्याची मालिका सुरू झाली असून यामध्ये भाजप व शिवसेना शिंदे गट आघाडीवर आहेत. आपल्या पक्षाची ताकद वाढवण्यावर एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भर देत असताना दुसरीकडे भाजपाने नव्या सेनापतींच्या नेतृत्वाखाली पालिका निवडणुका लढण्याची योजना आखल्याचे जिल्हाध्यक्ष नियुक्तीवरून स्पष्ट होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.