Kamal Nath News : भाजपनं वाढवलं कमलनाथ यांचं टेन्शन, मतदारसंघातच पाडलं खिंडार

BJP Politics : मागील काही दिवसांपासून कमलनाथ हे भाजपमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. या चर्चेनंतर भाजपने डाव साधला आहे.
Kamal Nath, Nakul Nath
Kamal Nath, Nakul NathSarkarnama
Published on
Updated on

Madhya Pradesh Political News : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. या चर्चा फेटाळून लावत कमलनाथ यांनी आपण काँग्रेसमध्ये राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या चर्चेवरून धूळ खाली बसत नाही तोच भाजपने डाव साधला आहे. कमलनाथ यांचा बालेकिल्ला आणि खासदार पुत्राचा मतदारसंघ असलेल्या छिंदवाडामध्ये भाजपने काँग्रेसला खिंडार पाडण्यास सुरुवात केली आहे. (Kamal Nath News)

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तोंडावर काँग्रेसमधून अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. आता मध्य प्रदेशातही त्याला सुरुवात झाली आहे. कमलनाथ यांच्यापासून त्याला सुरुवात होईल, अशी चर्चा होती. पण त्यांच्या पक्ष प्रवेशाला भाजपमधूनच (BJP) विरोध होत आहे. मात्र, खासदार नुकलनाथ यांच्यासाठी भाजप अनुकूल आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या एक्स हँडलवरून काँग्रेसचा (Congress) उल्लेख काढल्याने या चर्चांना उधाण आले.

Kamal Nath, Nakul Nath
Satyapal Malik News : सत्यपाल मलिकांभोवती 'सीबीआय'ने आवळला फास; देशभरात 30 ठिकाणी रेड

कमलनाथ यांनी मात्र भाजप प्रवेशाच्या चर्चेवर पडदा टाकला आहे. मात्र, दुसरीकडे भाजपने त्यांच्या छिंदवाडा मतदारसंघात काँग्रेसमध्ये फोडाफोडीचे राजकारण सुरू केले आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या उपस्थितीत बुधवारी काँग्रेसचे प्रदेश महासचिव उज्ज्वल सिंह चौहान यांच्यासह अनेक नगरसेवक, सरपंच, सदस्य तसेच कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

छिंदवाडा भाजपच्या जिल्हाध्यक्षांच्या दाव्यानुसार, ‘सुमारे 1500 काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामध्ये सर्वाधिक कार्यकर्ते पांढुर्णा जिल्ह्यातील आहेत. नगरपालिका अध्यक्ष, नगरसेवाक, जिल्हा परिषद सदस्य, 16 सरपंद व सदस्यांचा पक्ष प्रवेश झाला आहे.’ काही कार्यकर्ते इतर पक्षात गेले तरी पक्ष आणि संघटनेवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही, असे काँग्रेसचे प्रवक्ते आनंद बक्षी म्हणाले.

दरम्यान, कमलनाथ हे छिंदवाडा लोकसभा मतदारसंघातून नऊ वेळा विजयी झाले आहेत. ते दोनदा छिंदवाडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. सध्या त्यांचे पुत्र नकुलनाथ हे खासदार आहेत. 2019 च्या निवडणुकीत भाजपला हा एकमेव मतदारसंघ जिंकता आला नाही. भाजपला राज्यात 29 पैकी 28 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे या मतदारसंघावरही आता भाजपचा डोळा असून, नकुलनाथ यांनाच पक्षात घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.

R

Kamal Nath, Nakul Nath
CM Jagan Mohan Vs YS Sharmila : बहिणीमुळे 15 जागा जिंकल्या होत्या, मुख्यमंत्री भावाला त्याचाच धसका!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com