kamala Harris : अखेर ठरलं! अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस उमेदवार

Kamala Harris Candidate for President USA : बायडन यांना कोरोनाची लागन झाल्याचे समोर आले होते. त्यावेळी बायडन यांनी ट्विट करत राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले होते.
kamala Harris
kamala Harrissarkarnama
Published on
Updated on

kamala Harris : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून कमला हॅरिस यांच्या नावाची अधिकृत घोषणा डेमोक्रेटिक पक्षाकडून करण्यात आली आहे. जो बायडन यांनी प्रकृतीच्या कारणावरून अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली होती. माघार घेत असताना त्यांनी कमला हॅरिस यांना पाठींबा दिला होता.

'आज मी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी अधिकृतपणे माझी उमेदवारी जाहीर करणाऱ्या फॉर्मवर स्वाक्षरी केली. प्रत्येक मत मिळविण्यासाठी मी कठोर परिश्रम करेन', असे ट्विट कमला हॅरिस यांनी केले आहे.

अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी जो बायडन हे डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार होते. मात्र, वाद विवादात ते डोनाल्ड ट्रम्प यांच्या मागे पडल्याचे दिसत होते. वयानुसार त्यांना काही गोष्टी विसरत असल्याचे देखील वाद विवाद दरम्यान पाहण्यास मिळाले. त्यामुळे बायडेन यांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी,यासाठी पक्षांतर्गत दबाव त्यांच्यावर वाढत होता.

kamala Harris
Video Mamata Banerjee : पंतप्रधानांसमोरच संतप्त होत नीती आयोगाची बैठक सोडली, बाहेर येताच ममता बॅनर्जी सरकारवर तुटून पडल्या

ट्रम्प यांच्यावर झालेल्या गोळीबारानंतर बायडन यांच्यावर टीका करण्यात येत होती. त्यानंतर बायडन यांना कोरोनाची लागन झाल्याचे समोर आले होते. त्यावेळी बायडन यांनी ट्विट करत राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले होते.

बायडन यांच्या माघारीनंतर कमला हॅरिस यांचे नाव उमेदवारीसाठी आघाडीवर होते. बायडन यांनी हॅरिस यांच्या नावाला पसंती दिली होती. त्यानंतर माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी देखील कमला हॅरिस यांना पाठींबा दिला होता.

kamala Harris
Sharad Pawar Vs Amit Shah : अमित शहांनी बोट दाखवले, शरद पवारांनी इतिहास काढत घायाळ केले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com