Kangana Ranaut Emergency Movie : कंगना रनौतच्या 'Emergency'ला अखेर 'Censored'कडून मिळाला 'Green Signal'

Emergency Movie News Update : मात्र आता चित्रपट प्रदर्शित कधी होणार? यावरील सस्पेन्स सध्या कायम आहे.
Emergency
EmergencySarkarnama
Published on
Updated on

Emergency Movie and Censored Certificate बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौतचा चर्चित चित्रपट 'इमरजन्सी'च्या रिलीजचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण, सेन्सॉर बोर्डाकडून या चित्रपटास क्लीनचिट दिली गेली आहे. त्यामुळे आता कंगना रनौतच्या चाहत्यांना गुड न्यूज मिळाली आहे. मात्र हा चित्रपट नेमका कधी रिलीज होणार याबाबत अद्याप तरी काही अपडेट बाहेर आलेली नाही.

या चित्रपटातील काही दृश्यांमुळे हा चित्रपट बऱ्याच काळापासून वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. मात्र आता सेन्सॉरकडून प्रमाणपत्र मिळाल्याने चित्रपट रिलीज होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. स्वत: कंगना रनौतने(Kangana Ranaut) याबाबत माहिती दिली आहे.

कंगनाने आपल्या सोशल मीडिया अकाउंट X वर पोस्ट केली की, आम्हाला हे सांगताना अतिशय आनंद होत आहे की इमरजन्सी चित्रपटास सेन्सॉरचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. आम्ही लवकरच चित्रपटाच्या रिलीजची तारीखही जाहीर करू. तुमच्या संयम आणि सहकार्याबद्दल आभारी आहे.

Emergency
Kangana Ranaut : ...म्हणून कंगना रनौतच्या 'Emergency'ची 'रिलीज डेट' ढकलली पुढे !

कंगनाचा हा चर्चित चित्रपट याआधी 6 सप्टेंबर 2024 रोजी रिलीज होणार होता. परंतु शीख संघटनांकडून मोठ्याप्रमाणात विरोध प्रदर्शन झाल्याने रिलीजची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. शीख संघटनांचा आरोप होता की, या चित्रपटात त्यांच्या समाजाची चुकीची प्रतिमा दाखवली गेली आहे.

14 ऑगस्ट रोजी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता. तेव्हापासूनच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. पंजाबमध्ये मोठ्याप्रमाणत विरोध दर्शवण्यात आला होता. शिरोमणी अकाली दलाच्या(Shiromani Akali Dal) दिल्लीतील संघटनेने चित्रपटास विरोध दर्शवला होता. शिरोमणी अकाली दलाच्या दिल्ली अध्यक्षांनी चित्रपटावरून सेन्सॉर आणि कंगना रनौतच्या प्रॉडक्शन हाउसला नोटीस पाठवली होती.

CBFCने आधी चित्रपटास प्रमाणपत्र दिलं होतं. परंतु जेव्हा शीख संघटनांचा विरोध दिसून आला आणि असं दिसून आलं की विरोध करणारे मध्य प्रदेश उच्च न्यायालयापर्यंत पोहचले होते. तर केंद्र सरकारकडून सांगितलं गेलं की, सध्या मेकर्सना प्रमाणपत्र जारी केले गेले नाही. मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने CBFCला आदेश दिला की प्रमाणपत्र देण्याआधी शीख संघटनांच्या आक्षेपांवर लक्ष द्यावे.

दुसरीकडे निर्मात्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. चित्रपटा प्रमाणपत्र न दिल्या गेल्याने निर्मात्यांनी मुंबई उच्च न्यायायलयाचा दरवाजा ठोठवला होता. CBFCने पुनरावलोकन समिटी बनवली, ज्यामध्ये कंगना रनौत यांना चित्रपटात बदल करण्याच्या सूचना केल्या गेल्या.

Emergency
BJP And Eknath Shinde : लोकहो आता तुम्हीच सांगा, कोणाचा 'त्याग' मोठा, भाजपचा की शिंदे गटाचा?

प्राप्त माहितीनुसार सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र देण्यासाठी काही अटी ठेवल्या होत्या. त्यांच्याकडून चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप नोंदवला गेला होता आणि निर्मात्यांना यामध्ये बदल करण्याचे आदेश दिले होते. तर ऐतिहासिक मुद्य्यांवर डिस्क्लेमर टाकण्याचे आदेश दिले होते.

इमरजन्सी चित्रपटात कंगना रनौत प्रमुख भूमिके असून माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकरत आहे. यामध्ये कंगनाने अभिनयानसोबतच दिग्दर्शन आणि निर्मिती देखील केली आहे. चित्रपटात अनुपम खेर, श्रेयस तळपदे, महिमा चौधरी सारख्या अन्य अनेक कलाकारांनी महत्त्वाची भूमिका निभावलेली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com