Kangana Ranaut : 'गटर पिढी' ते 'तरुणचं देशाचं खरं..! Gen Z बद्दल कंगना रनौत यांचा अचानक यू-टर्न; नक्की काय घडलं?

Kangana Ranaut calls Gen Z real strength of country : Gen Z बाबत कंगना रनौत यांच्या भूमिकेत बदल झाल्याची चर्चा आहे. ‘गटर पिढी’ म्हणण्यापासून तरुणांना देशाची खरी ताकद म्हणण्यापर्यंत नेमकं काय घडलं? जाणून घ्या.
Kangana Ranaut
Kangana RanautSarkarnama
Published on
Updated on

Kangana Ranaut Gen Z latest statement : Gen Z म्हणजेच जनरेशन झेडवर केलेल्या वक्तव्यामुळे काही दिवसांपूर्वी अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौत चर्चेत आल्या होत्या. नीट पेपर फुटीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी तरुण पिढीवर जोरदार टीका केली होती. Gen Z ला त्यांनी थेट ‘गटर पिढी’ असे संबोधल्याने त्यांच्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. सोशल मीडियावरही कंगना रनौत यांच्या या विधानावरून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

विशेष म्हणजे, टीका होत असतानाही कंगना रनौत आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसून आले होते. मात्र आता त्यांच्या सूर पूर्णपणे बदलल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी तरुण पिढीवर विश्वास व्यक्त केल्यानंतर कंगना यांनीही Gen Z चे कौतुक केले आहे. त्यामुळे त्यांच्या या नव्या वक्तव्याची राजकीय आणि सोशल मीडिया वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

Kangana Ranaut
Teacher Recruitment 2026 : कोल्हापुरात 606 शिक्षक भरती होणार, कोणत्या विषयाला किती शिक्षक सेवेत घेणार? जाणून घ्या

कंगना रनौत यांनी म्हणाल्या, “जनरेशन झेड (Gen Z) ही आपल्या देशाची ताकद आहे आणि एका अर्थाने आपल्या देशाचा एक मोठा वारसा आहे. मोहन भागवत जी यांना देशात अत्यंत आदराचे स्थान आहे. त्यांच्या ज्ञानाचा, विचारांचा आणि अनुभवांचा लाभ आम्हाला अनेक वेळा घेता आला आहे. देशातील युवा पिढी आपल्या समृद्ध संस्कृतीचे प्रतिनिधी आणि राजदूत म्हणून पुढे येत आहे, ही अत्यंत आनंदाची, समाधानाची आणि अभिमानाची बाब आहे.”

कंगना यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओही समोर आला आहे. 'गटर पिढी' म्हणणाऱ्या कंगना रनौत यांनी आता Gen Z ला'देशाची ताकद' म्हटल्याने त्यांच्या भूमिकेतील हा बदल चर्चेचा विषय ठरला आहे. कंगना यांच्या या 360 डिग्री यू-टर्नमागे मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा प्रभाव आहे का, याबाबतही सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com