Teacher Recruitment 2026 : कोल्हापुरात 606 शिक्षक भरती होणार, कोणत्या विषयाला किती शिक्षक सेवेत घेणार? जाणून घ्या

Kolhapur teacher recruitment subject wise vacancy details : कोल्हापुरात 606 शिक्षकांची भरती होणार आहे. कोणत्या विषयासाठी किती शिक्षक सेवेत घेतले जाणार, शिक्षक भरतीची माहिती आणि विषयवार रिक्त पदांचा तपशील जाणून घ्या.
Maharashtra school education
Maharashtra school educationSarkarnama
Published on
Updated on

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांत मिळून एकूण ३०,२०९ तर कोल्हापूर जिल्ह्यात ६०६ शिक्षक पदांच्या भरतीला मिळाल्यानंतर राज्य सरकारकडून ' यासाठी शिक्षकांना 11 ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात जवळपास 606 शिक्षकांची भरती केली जाणार आहे.

राज्यात एकूण पदसंख्येत १९,८८१ उमेदवारांची निवड ही मुलाखतीशिवाय, तर १०,३२८ उमेदवारांची निवड मुलाखतीसह निवड केली जाणार आहे. उमेदवारांनी दिनांक ६ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट २०२६ या मुदतीत पसंतीक्रम पोर्टलवर 'लॉक' करणे अनिवार्य आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच मुलाखतीशिवाय निवडल्या जाणाऱ्या उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

Maharashtra school education
Maharashtra Government : महाराष्ट्र सरकारचा 114 मासिकांवर सर्जिकल स्ट्राईक; राजपत्र जारी, धक्कादायक कारण आलं समोर...

कोल्हापूर जिल्ह्यात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागात 606 शिक्षकांची भरती केली जाणार आहे. त्यातील प्राथमिक मध्ये पहिली ते पाचवीसाठी ३४६, व माध्यमिक सहावी ते आठवी गणित-विज्ञान विषयांच्या १३० जागा व इंग्रजी विषयाच्या १३० जागा भरण्यात येणार आहेत.

विद्यार्थी उमेदवारांना दिलासा, 'या विदयार्थ्यांना पुढील भरतीला संधी

दोन वर्षांपूर्वी झालेल्या शिक्षक भरती मध्ये अनेक विद्यार्थ्यांना काही कारणास्तव शिक्षक होता आले नाही. त्यामुळे या शिक्षक भरतीच्या निर्णयाने पुन्हा एकदा या विद्यार्थी उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. नुकतीच टी ए टी ची परीक्षा पेपर फुटी मुळे रद्द झाली. ही परीक्षा झाली असती तर पात्र उमेदवारांना अभियोग्यता परीक्षेत पात्र व्हावे लागते. त्यामुळे यावेळी टी ई टी ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील भरती वेळीच संधी मिळण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com