Kangana Ranaut : 'आम्ही पाकव्याप्त काश्मीरलाही सोबत घेणार...', कंगना रनौतचा दावा

Kangana Ranaut statement on Pakistan-occupied Kashmir: बटेंगे तो कटेंगे या घोषणेला भाजपमधील काही नेत्यांकडून विरोध करण्यात येत आहे. मात्र, या घोषणाच्या समर्थनार्थ खासदार कंगना रनौत मैदानात उतरल्या आहेत. बटेंगे तो कटेंगेची घोषणा ही एकतेसाठी केलेले आवाहन आहे, असे कंगना म्हणाल्या.
Kangana Ranaut
Kangana Ranaut Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगे या घोषणेवरून घमासान सुरू आहे. भाजपच्या काही नेत्यांकडून या घोषणेला विरोध करण्यात येतो आहे. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घोषणेचे समर्थन केले आहे. आता खासदार कंगना रनौत या देखील या घोषणाच्या समर्थनासाठी उतरल्या आहेत.

कंगना रनौत म्हणाल्या, 'बटेंगे तो कटेंगे ही घोषणा म्हणजे एकतेसाठी केलेले आवाहन आहे. एकता ही आपली शक्ती आहे. ते आपण लहानपणापासून वाचत आलो आहोत. एकता हीच ताकद आहे. आमचा पक्ष सनातनी पक्ष आहे आणि आमचा पक्ष पीओकेला (पाकव्याप्त काश्मीर) सोबत घेऊ इच्छितो. विरोधकांचा फूट पाडण्याचा डाव फसला आहे...'

Kangana Ranaut
Manoj Jarange Patil : आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना आडवे करा! मनोज जरांगे पाटील गरजले

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बटेंग तो कटेंगे या घोषणेला विरोध केला आहे. त्या म्हणाल्या की महाराष्ट्राची निवडणूक ही विकासावर लढवली जात आहे. त्यामुळे बटेंगे तो कटेंगे याला काही अर्थ नाही. पंकजा मुंडे यांच्या पाठोपाठ अशोक चव्हाण यांनी देखील बटेंगे तो कटेंगे घोषणेला विरोध दर्शवला आहे. महायुतीमधील भाजपचा मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी देखील ही घोषणा योग्य नसल्याचे म्हटले.

देवेंद्र फडणवीसांकडून समर्थन

भाजपमधील नेते बटेंगे ते कटेंगेच्या घोषणेला विरोध करत असताना देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडेंनी मात्र या घोषणेचे समर्थन केले आहे. पुण्यातील आपल्या एका सभेत फडणवीसांनी जर व्होट जिहाद होत असले तर आपणही मतांसाठी धर्मयुद्ध केले पाहिजे, असे आवाहन केले आहे.

एक है तो सेफ है...

बटेंगे तो कटेंगेच्या घोषणेला महाराष्ट्रात प्रतिसाद मिळणार नाही, असे विरोधी पक्षाकडून टीका करण्यात येत आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रचारात बटेंगे तो कटेंगेच्या येवजी 'एक है तो सेफ है' या घोषणेवर भर दिल्याचे दिसून येत आहे.

Kangana Ranaut
Election Commission Notice : ...म्हणून निवडणूक आयोगाने भाजप अन् काँग्रेस अध्यक्षांना पाठवली नोटीस !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com