
Mahayuti government budget 2025 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये विविध क्षेत्रासाठी तसेच राज्यभरातील विविध भागांसाठी निधीची घोषणा केली गेली. या अर्थसंकल्पावर आता प्रतिक्रियाही येत आहेत. कही खुशी तर कही गम असे वातावरण पाहायला मिळत आहे. त्यातच आता अमरावतीकरांसाठी हा अर्थसंकल्प आनंदाची वार्ता घेवून आल्याचे दिसत आहे.
कारण, अमरावतीमधील(Amratvati) बेलोरा विमानतळाचे काम पूर्ण झाले असून ३१ मार्चपासून या विमानतळावरून प्रवासी विमानसेवा सुरू होण्याची चिन्हं आहेत. तसे सरकारचे नियोजन असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अमरावतीकरांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
विशेष म्हणजे नुकतीच अमरावतीमधील या विमानतळावर एअर कॅलिबरेशन प्रिसिजन अप्रोच पाथ इंडिकेटर म्हणजेच पीएपीआय ही विमानसेवा सुरू करण्यापूर्वीची महत्वपूर्ण चाचणी यशस्वीरित्या पार पडलेली आहे. त्यामुळे आता अमरावतीकरांना त्यांच्या शहरातून विमानप्रवासाची सोय लवकरच उपलब्ध होणार असल्याचे दिसत आहे. प्राप्त माहितीनुसार कनेक्टिव्हिटी योजनेअंतर्गत मुंबई(Mumbai)-अमरावती-मुंबई मार्गावर अलायन्स एअर या कंपनीच्या माध्यमातून एटीआर ७२ आसनी विमान सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे.
अमरावतीमधील विमानतळावरून विमान सेवा सुरू करण्यासाठी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून (DGCA) परवानगी मागितली गेली आहे. आता केवळ ही परवानगी येण्याचाच उशीर आहे शिवाय ३१ मार्चपासून प्रवासी विमान सेवा सुरू होईल असे संकेतही अर्थमंत्र्यांनी दिलेले असल्याने, आता अमरावतीमधून नियमित विमानसेवा सुरू होईल असे दिसत आहे.
अमरावती विमानतळावर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने काम करण्यात आले असून, नवीन धावपट्टी तयार केली गेली आहे. हवाई वाहतूक तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली बंगळुरूहून अमरावतीच्या बेलोरो विमानतळावर उड्डाण केलेल्या विमानावर डीजीसीआयच्या फ्लाइट इन्स्पेक्शन युनिटने कॅलिब्रेशन केले जे यशस्वी झाले.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.