
Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली भागातील वारणा नदीत मळीमिश्रीत पाणी सोडून नदी प्रदूषित करण्यास कारणाभूत ठरल्याप्रकरणी आमदार विनय कोरे यांचा वारणा सहकारी साखर कारखान्याला सांगलीतील प्रदूषण नियंत्रण मंडळ दणका देण्याच्या तयारीत आहे. कारखान्याविरोधात कारवाई करावी, असा प्रस्ताव कोल्हापूर मंडळाने प्रादेशिक अधिकाऱ्यांकडे सादर केला आहे.
कारखान्याने प्रदुषणाच्या आरोपावरून हात झटकले आहेत. नदीतील मासे आणि मगरीच्या मृत्यूशी वारणा साखर कारखान्याचा कोणताही संबंध नाही. कारवाईच्या नोटीसला आम्ही योग्य उत्तर देऊ, असे स्पष्टीकरण वारणा साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक शहाजी भगत यांनी दिले आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील काही भागात वारणा नदीतील मासे मृत्युमुखी पडण्याच्या घटना घडल्या होत्या. सांगली जिल्ह्यात दुधगाव येथे मगरीचे पिल्लू, तर उदगाव येथे पूर्ण वाढ झालेली मगर मृत आढळून आली. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार दिल्यानंतर सांगली आणि कोल्हापूर रोशन नियंत्रण पथकाने घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. त्या ठिकाणी चे पाण्याचे नमुने घेत काही मासे ही ताब्यात घेण्यात आले.
कोल्हापूर आणि सांगली प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या पथकाने चांदोली धरणापासून ते हरिपूर संगमापर्यंत नदीच्या पात्राची पाहणी केली. या पाहणी दरम्यान वारणा सहकारी साखर कारखान्याचे मळीमिश्रित पाणी वारणा नदीत मिसळत असल्याचा संशय पथकाला आहे. त्या ठिकाणावरील देखील पाण्याचे नमुने या पथकाने तपासणीसाठी पाठवले आहेत. त्यानंतर कारखान्याविरोधात कारवाईचा प्रस्ताव देण्यात आला आहे.
दरम्यान, या सर्व प्रकरणानंतर कारखाना प्रशासनाने देखील या प्रकरणाशी काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. आम्हाला नोटीस मिळाल्यानंतर आम्ही योग्य उत्तर देऊ. कारखान्याचे पाणी प्रक्रिया करूनच वापरले जाते. असे स्पष्टीकरण कारखाना प्रशासनाने दिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.