Kalicharan Maharaj : कालीचरण महाराजांनी पुन्हा तोडले अकलेचे तारे ; म्हणाले,'गांधींबाबत गोडसेंनी योग्यच ..'

kalicharan maharaj controversial statment : कालीचरण महाराजांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.
kalicharan maharaj controversial statment
kalicharan maharaj controversial statment Sarkarnama
Published on
Updated on

kalicharan maharaj controversial statment over mahatma gandhi : जहाल हिंदुत्ववादी चेहरा म्हणून कालीचरण महाराजांची ओळख आहे. नेहमीच वादग्रस्त विधान करणाऱ्या कालीचरण महाराजांनी पुन्हा एकदा अकलेचे तारे तोडले आहेत.

"नथुराम गोडसे नसते तर देशाचा नाश झाला असता. नथुराम गोडसे यांना कोटी कोटी प्रणाम आहे," असे विधान त्यांनी केल्याने वाद निर्माण केला आहे. सोशल मीडियावर कालीचरण महाराज यांचा निषेध करण्यात येत आहेत, त्यांनी माफी मागावी, अशी मागणी होत आहे.

"नथुराम गोडसेने महात्मा गांधींबाबत जे केले ते योग्यच केले, जितके नथुराम गोडसेंना वाचाल तेवढे तुम्ही त्यांचे भक्त व्हाल, असा विश्वास कालीचरण महाराज यांनी व्यक्त केला आहे.

महात्मा गांधी यांच्याबाबत यापूर्वीही कालीचरण महाराज यांनी वादग्रस्त विधान केले होते. हरिद्वारच्या धर्मसंसदेत त्यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याप्रकरणी त्यांना अटक झाली होती. मूळ अकोला येथील असलेल्या कालीचरण महाराजांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.

kalicharan maharaj controversial statment
Supriya Sule : राऊतांना धमकी आल्यानंतर सुळेंचा फडणवीसांना सल्ला ; झेपत नसेल तर गृहमंत्रालय..

छत्तीसगडची राजधानी इथे भरलेल्या धर्मसंसदेमध्ये महात्मा गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य करताना कालीचरण महाराज यांनी गांधीजींचा मारेकरी नथुराम गोडसेला वंदन केलं. त्यावेळी काही उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या होत्या.

kalicharan maharaj controversial statment
Naresh Mhaske : 'अजितदादांचे पुतळे जाळा' असे सांगणे ही गद्दारी की खुद्दारी ? ; आव्हाडांना म्हस्केंचा सवाल

सोशल मीडियावर यापूर्वी शिवतांडव स्त्रोताचा एक व्हीडिओ व्हायरल झाला होता, तेव्हापासून ते प्रकाशझोतात आले. कालीचरण महाराज नावाने प्रसिद्ध असलेल्या या महाराजांचं मूळ नाव हे अभिजित सराग असं आहे. 2017 मध्ये त्यांनी अकोला महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.

कोरोना काळात त्यांनी लसीकरण, जागतिक आरोग्य संस्था (WHO) याबाबत वादग्रस्त विधान केले होते. जागतिक आरोग्य संस्था (WHO) ही बनावट संस्था आहे आणि या संस्थेतील कर्मचारी डॉक्टर, वैज्ञानिक सगळे आमच्या दृष्टिकोनातून बनावट आहेत, असं ते म्हणाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com