Assembly Elections: निवडणुकीपूर्वीच काँग्रेसकडून मोठी घोषणा : दारिद्र रेषेखालील कुटुंबांना..

Karnataka Assembly Elections : कर्नाटकात सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेसची ही खेळी यशस्वी होणार का ?
Congress
CongressSarkarnama
Published on
Updated on

Karnataka Assembly Elections : कर्नाटक विधानसभा निवडणुकीला काही महिने बाकी आहेत. या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी पक्षाकडून विविध आमिष दाखविण्यास सुरवात झाली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार आणि विरोधीपक्षनेते सिद्धारमैया यांनी मोठी घोषणा केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सत्तेत आली तर दारिद्र रेषेखालील कुंटुबियांना प्रत्येक महिन्याला १० किलो धान्य मुक्त देण्यात येईल, अशी घोषणा शिवकुमार यांनी केली आहे. यापूर्वीही काँग्रेसकडून दोन महत्वाचे आश्वासन देण्यात आले होते.

यापूर्वी कर्नाटक काँग्रेसने २०० युनिट वीज मोफत देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांच्या उपस्थितीत गरीब कुटुंबातील महिलेला दर महिन्याला दोन हजार रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. आगामी विधानसभेच्या आधीच आता काँग्रेसने ही घोषणा केल्याने मतदारांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Congress
Nitesh Rane : केजरीवाल-ठाकरे भेटीनंतर राणेंचं टि्वट ; म्हणाले, ' खलिस्तानवाद्यांचं समर्थन.."

कर्नाटकात सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेसची ही खेळी यशस्वी होते का, हे निकालानंतर कळेल. कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार यांनी याबाबत माध्यमांना सांगितले. ते म्हणाले,"राज्यात काँग्रेसची सत्ता आली तर अन्न भाग्य योजनेच्या माध्यमातून दारिद्र रेषेखालील जनतेला १० किलो धान्य देण्यात येईल. राज्यातील जनतेला विशेषत: महिला, युवकांना हे आश्वासन देताना आम्हाला आनंद होत आहे,"

Congress
CM Maharashtra : मुख्यमंत्रिपदासाठी नशीबही लागतं का ?

यंदा कर्नाटक, तेलंगण, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मेघालय, नागालँड, मिझोराम, त्रिपुरात निवडणुका आहेत. जम्मू-काश्मीरातही शक्यता आहे. यापैकी ६ राज्यांतील सरकार वाचवण्याचे आव्हान भाजपसमोर आहे.

आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केलीय. या निवडणुकांना अजून जवळपास एक वर्ष बाकी आहे. परंतु, त्यासाठी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. वेगवेगळ्या रणनीतींच्या माध्यमातून सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com