RSS criticism : ‘संघ हा दैत्यासारखा’! मंत्री प्रियांक खर्गे यांच्या विधानानं राजकीय वाद

Priyank Kharge Slams RSS and BJP at Gandhi Bhavan Event in Bengaluru : कर्नाटक राज्यातील मंत्री प्रियांक खर्गे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेल्या विधानावरून राजकीय वाद सुरू झाला आहे.
Priyank Kharge Slams RSS and BJP
Priyank Kharge Slams RSS and BJPSarkarnama
Published on
Updated on

Karnataka Congress : महाराष्ट्र राज्यात टिपू सुलतान अन् छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तुलनेवरून काँग्रेसविरुद्ध भाजप असा राजकीय पेटला असतानाच, कर्नाटकमध्ये देखील असाच भडका उडाला आहे.

कर्नाटकच्या काँग्रेस सरकारमधील मंत्री प्रियांक गांधी यांनी एका कार्यक्रमात, 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा दैत्यासारखा असून, भाजप हा त्या दैत्याची सावली आहे', असे खळबळजनक विधान केले आहे. यावरून कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारविरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अन् भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

काँग्रेसचे (Congress) प्रियांक खर्गे म्हणाले, ‘‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा दैत्यासारखा असून भाजप हा त्या दैत्याची सावली आहे. सावलीशी लढण्यापेक्षा दैत्याशीच लढले पाहिजे. ’’ बंगळुरातील गांधी भवन इथं आयोजित पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपला चांगलच टार्गेट केलं.

मंत्री प्रियांक खर्गे पुढे म्हणाले, ‘‘संघप्रमुख धर्मरक्षणासाठी तीन मुले जन्माला घाला असे सांगतात; मात्र स्वतः ब्रह्मचारी राहतात. हा कसला धर्मरक्षणाचा प्रकार?’’ तसेच संघाकडे येणाऱ्या देणग्यांबाबत पारदर्शकता नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) नोंदणी करणे आवश्यक असून त्यांना लवकरच ती कार्यवाही करावी लागेल; अन्यथा मीच ती करायला लावेन, असे आव्हान मंत्री खर्गे यांनी दिले.

Priyank Kharge Slams RSS and BJP
Bachchu Kadu On Tukaram Mundhe : ‘वेग’ कुठे अन् ‘तोरा’ कुठे? तुकाराम मुंढेंच्या तोऱ्यावर बच्चू कडूंचा घणाघात

भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी मंत्री खर्गे यांच्या विधानाचा समाचार घेतला. संघ परिवारावरील द्वेषातूनच हे विधान करण्यात आले असून ते बेजबाबदार, अविवेकी आणि उडाणटप्पूपणा आहे, अशी टीका त्यांनी केली.

Priyank Kharge Slams RSS and BJP
Shiv Sena UBT vs Eknath Shinde : मुंबईचा सौंदर्यभंग की सत्तेचा दुरुपयोग? उपमुख्यमंत्री शिंदेंवर गुन्हा दाखल होणार का? ठाकरेंच्या शिलेदाराचा थेट 'BMC'ला सवाल

दरम्यान, महाराष्ट्रात टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना केल्याचा आरोपावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात सत्ताधारी भाजपने राज्यातील राजकीय वातावरण तापवलं आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानावर राज्यातील जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी भाजपकडून निषेध आंदोलन केले जात आहे.

हर्षवर्धन सपकाळ यांच्या तोंडाला काळं फासण्याची भाषा, तर जीभ छाटण्याची भाषा सत्ताधारी भाजपकडून वापरली जात आहे. पुण्यात भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने झाले. भाजपने काँग्रेस कार्यकर्त्यांवर दगडफेक केली. याप्रकरणी गुन्हा देखील दाखल झाला आहे. यातून राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात अशी परिस्थिती असतानाच, कर्नाटक राज्यात सत्ताधारी काँग्रेसमधील मंत्री प्रियांक खर्गे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपविरोधात विधान करून, तिथलं राजकीय वातावरण तापवलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com