

बंगळुरु : सध्या देशात 'द कश्मिर फाईल्स' (The Kashmir Files) चित्रपटावरुन आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण रंगले आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या चित्रपटावरुन भाजपला (BJP) टोला लगावत कश्मिर फाईल्स पेक्षा बेळगाव फाईल्स गंभीर आहे. अशा आशयाचे व्यंगचित्र ट्वीट केले होते. त्यावर भाष्य करताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादच अस्तित्वात नसल्याचे म्हटले आहे.
बंगळुरू येथे बोम्मई प्रसार माध्यमांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, केंद्र सरकारने 1956 मध्ये केलेल्या भाषावार प्रांतरचनेत कन्नड भाषिकांची मोठी संख्या असलेले सोलापूर, अक्कलकोट महाराष्ट्राला दिले. त्याबदल्यात कर्नाटकला बेळगाव मिळाले होते. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न अस्तित्वातच नाही. हा वाद कधीच संपुष्टात आला आहे, असा जावईशोध बोम्मई यांनी लावला.
महाराष्ट्रातील नेते तेथील समस्यांपासून लोकांचे लक्ष विचलीत करण्यासाठी हा वाद उकरून काढतात, असा आरोपही बोम्मई यांनी केला. बोम्मई यांच्या या विधानावर तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी लवकरच महाराष्ट्राच्या विधीमंडळ अधिवेशनात ठराव संमत होणार आहे. त्याच बरोबर या वादावर सर्वोच्च न्यायालयालयात सुरु असलेल्या सुनावणीला गती देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील सर्वपक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या प्रश्नासंदर्भात भेट घेणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.