"शिवसेना पाठीत वार करत नाही" : क्षीरसागरांनी दिला काँग्रेसला दिलासा

Shivsena | Congress | Kolhapur | Bye poll : क्षीरसागरांच्या उपस्थितीत जयश्री जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल
Rajesh Kshirsagar-Satej Patil
Rajesh Kshirsagar-Satej PatilSarkarnama
Published on
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीसाठी आज काँग्रेसच्या (Congress) उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव (jayshri Chandrkanat Jadhav) यांनी महाविकास आघाडीकडून त्यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल केला. आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन झाल्याने त्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. यावेळी उच्च-तंत्रशिक्षणमंत्री आणि शिवसेनेचे संपर्कमंत्री उदय सामंत, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, कोल्हापूरचे पालकमंत्री आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांची उपस्थिती होती.

याशिवाय एक लक्षणीय उपस्थिती होती ती राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची. संबंधित जागा ही काँग्रेसला सोडल्यामुळे राजेश क्षीरसागर हे मागच्या काही काळपासून नाराज होते. ते दोन दिवस नॉट रिचेबल देखील होते. मात्र शिवसेना नेतृत्वाने समजूत काढल्यानंतर क्षीरसागर यांनी आज जाधव यांचा अर्ज भरण्यास उपस्थित लावली. याशिवाय शिवसेनेत पाठीत वार करायची संस्कृती नाही. जयश्री जाधव यांचा विजय कोणत्याही परिस्थितीत होणार, असे म्हणतं त्यांनी काँग्रेसला दिलासाही दिला.

Rajesh Kshirsagar-Satej Patil
जयंत पाटील - सदाभाऊंच्या मैत्रीची चर्चा; अजितदादा म्हणाले "कोणी कायमचा शत्रू नसतो"

क्षीरसागर म्हणाले, शिवसेनेच्या पक्ष प्रमुखांनी आदेश दिलेत. त्यावरुन या ठिकाणी एवढंच सांगतो की शिवसैनिक करुनच दाखवतो. आम्ही काय करणार म्हणून सांगायचं नसते. शिवसेनेत पाठीत वार करायची संस्कृती नाही. जयश्री जाधव यांचा विजय कोणत्याही परिस्थितीत होणार. ‘कोल्हापूर उत्तर’ची जागा ही काँग्रेसच्या वाट्याला गेली आहे. पण आपला शत्रू हा भाजप असून, भाजपला रोखण्यासाठी सर्व ताकदीनिशी कामाला लागा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले असून आपण त्याप्रमाणेच काम करणार असल्याचेही क्षीरसागर यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com