Karnataka Congress Government : काँग्रेसनं दिलेला शब्द पाळला! सिद्धरामय्या सरकारची महिलांसाठी 'ही' मोठी घोषणा

Chief Minister Siddaramaiah Big Announcement : कर्नाटक सरकारने सत्तेत आल्यापासून एकापाठोपाठ मोठ्या घोषणांचा धडाकाच लावला आहे.
Karnataka Government Cabinet Expansion
Karnataka Government Cabinet ExpansionSarkarnama
Published on
Updated on

Karnataka News : कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या प्रचारावेळी काँग्रेसने मतदारांना पाच आश्वासनं दिली होती. जर राज्यात त्यांचं सरकार आलं तर पहिल्या कॅबिनेट बैठकीत हे पाचही आश्वासनं पूर्ण करण्यात येतील असं जाहीर केलं होत. यात गृहज्योती, गृह लक्ष्मी, अनन्य भाग्य युवा निधी, शक्ती योजना यांचा समावेश आहे. आणि सत्तेत येताच काँग्रेसनं त्याची पूर्तता पहिल्याच कॅबिनेट बैठकीत केली होती. आता सिद्धरामय्या सरकारनं राज्यातील महिलांसाठी महत्वाची घोषणा केली आहे.

कर्नाटक सरकार(Karnataka Government) ने सत्तेत आल्यापासून एकापाठोपाठ मोठ्या घोषणांचा धडाकाच लावला आहे. यात आता राज्यातील महिलांना एसटी बससेवा मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे. सिद्धरामय्या सरकारकडून रविवार (दि.११ ) पासून शक्ती योजना राज्यभरात लागू करण्यात आली आहे. ज्या अंतर्गत महिला एसटी बसने मोफत प्रवास करु शकणार आहे. हा महिलांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे.

Karnataka Government Cabinet Expansion
Arvind Kejriwal News : मोदींच्या 'डिग्री'चा मुद्दा पुन्हा तापणार; आर्थिक दंड ठोठावल्यानंतरही केजरीवाल कोर्टात...

मुख्यमंत्री सिद्धरामय्या काय म्हणाले?

मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddhramaih) यांनी शक्ती योजना जाहीर केली आहे. या योजनेविषयी भाष्य करताना सिद्धरामैय्या म्हणाले, आंतरराज्यीय प्रवास करायचा असल्यास ही योजना लागू होणार नाही. तसेच एसी आणि वोल्वो बस वगळता सर्व बसमध्ये ही योजना लागू होत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. याचवेळी शेजारच्या राज्यातून २० किलोमीटरपर्यंत प्रवास करणाऱ्या महिलांसाठीही ही योजना लागू होणार असल्याचंही मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले.

पाच आश्वासनांची घोषणा..?

कर्नाटक निवडणूकीत प्रचार करताना काँग्रेस(Congress)ने पाच कलमी कार्यक्रम आखत पाच कर्नाटकातील पाच आश्वासने दिली होती. जर त्यांचे राज्यात सरकार आले तर कॅबिनेट बैठकीत पाच सुत्री योजना लागू केली जाईल, अशी घोषणा त्यांनी निवडणूक प्रचाराच्यावेळी केली होती. यामध्ये गृहज्योती, गृह लक्ष्मी, अनन्य भाग्य युवा निधी, शक्ती योजना यांचा समावेश आहे.

Karnataka Government Cabinet Expansion
Maharashtra politics : भाजपचे टार्गेट उद्धव ठाकरेच; अमित शाहांच्या भाषणात १० पेक्षा जास्त वेळा उल्लेख अन्...

काँग्रेसने कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी राज्यात ‘गृह ज्योती’ योजनेच्या अंतर्गत कर्नाटकातील सर्व घरांमध्ये 200 यूनिट फ्री वीज देण्याची घोषणा केली होती. तसेच ‘गृह लक्ष्मी’ या योजनेच्या अंतर्गत राज्यातील सगळ्या कुटुंबांतील महिला प्रमुखांना 2 हजार रुपये मासिक मदत देखील देण्याचं आश्वासन देण्यात आले आहे. ‘अन्न भाग्य’योजनेअंतर्गत बीपीएल कुटुंबांना दरमहा 10 किलो तांदूळ देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

युवानिधी योजना काय ?

त्यासोबतच पदवीधर बेरोजगार तरुणांना ३ हजार रुपये प्रतिमहिना आणि बेरोजगार डिप्लोमा धारकांना दीड हजार रुपये प्रतिमहना देण्यात येणार असल्याचे आश्वासन काँग्रेसकडून करण्यात आलेले आहे. या योजनेला युवानिधी योजना असे नाव देण्यात आले आहे.

Karnataka Government Cabinet Expansion
Bacchu Kadu: सरकारी रुग्णालयात अस्वच्छता, एका बेडवर दोन रुग्ण पाहून बच्चू कडू संतापले; अधिकाऱ्यांना खडसावत..

शक्ति योजने अंतर्गत राज्यातील सर्व महिलांना कर्नाटकातील आणि बीएमटीसीच्या बसेसमध्ये मोफत प्रवास करण्याची सुविधा देण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं. तसेच काँग्रेसने सरकारी नोकरदारांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासनही निवडुकीच्या प्रचारावेळी दिले आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com