
Mumbai, 20 March 2025: राष्ट्रपती पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या महाराष्ट्रातील IPS अधिकारी रश्मी करंदीकर या अडचणीत आल्या आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून त्यांना समन्स बजावण्यात आले आहे. करंदीकरांना गुन्हे शाखेनं दुसऱ्यांदा समन्स बजावलं आहे.
करंदीकर यांच्या पतीवर आर्थिक गैरव्यवहाराचे दोन गुन्हे दाखल आहेत. करंदीकर दापत्यांच्या बँक खात्यातील व्यवहाराची चौकशी करण्यासाठी रश्मी यांना समन्स पाठवल्याची माहिती आहे.
रश्मी करंदीकर यांना राष्ट्रपती पदकाने सन्मान करण्यात आला आहे. पोलीस दलातील त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांचा या पदकाने सन्मान करण्यात आला आहे.
रश्मी करंदीकर या महाराष्ट्र पोलीस दलातील आयपीएस अधिकारी आहेत.
करंदीकर यांनी मुंबई विद्यापीठातून सांख्यिकी विषयात B.Sc केले आहे.
वर्ष 2000 मध्ये ग्रॅज्युएशन केल्यानंतर त्यांनी समाजशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं.
रश्मी करंदीकर 2004 मध्ये पोलीस दलात रुजू झाल्या.
पोलीस अधिकारी म्हणून काम करताना रश्मी करंदीकर यांनी समाजशास्त्रात पीएचडीही केली.
रश्मी करंदीकर यांची महाराष्ट्र पोलीस दलात विविध पदांवर कर्तव्य बजावलं आहे.
मुंबईत सायबर सेलमध्ये काम करीत असताना सायबर क्राईमच्या अनेक केसेस त्यांनी सोडवल्या.
सायबर गुन्हेगारांपासून कसं दूर ठेवता येईल यासाठी देखील त्यांचे प्रामाणिक प्रयत्न सुरु आहेत .
सायबर क्राईमच्या केसेस सोडवण्याव्यतिरिक्त त्यांनी लोकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठीअनेक उपक्रम हाती घेतले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.