
Caste Survey Sparks Political and Social Debate in Karnataka : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी शुक्रवारी इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती आणि त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांच्यावर संताप व्यक्त केला. मूर्ती दाम्पत्याने कर्नाटकात सुरू असलेल्या जातनिहाय सर्वेक्षणात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून सिध्दरामय्या यांनी थेट इन्फोसिसचा उल्लेख करत आपली भूमिका स्पष्ट केली.
कर्नाटकात सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण सुरू आहे. त्यावरून प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने विरोध केला आहे. त्यातच राज्यसभेच्या खासदार सुधा मूर्ती यांनी या सर्वेक्षण सहभागी होणार नसल्याचे सांगितल्याचे समजते. त्यावर प्रतिक्रिया देताना सिध्दरामय्या म्हणाले, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांचे सर्वेक्षणातून बाहेर पडणे, हे गैरसमजुतीच्या आधारावर आहे.
कर्नाटकात सुरू असलेले सर्वेक्षण मागासवर्गाचे सर्वेक्षण नाही. त्यांना हे समजत नसेल तर मी काय करू? आम्ही 20 वेळ म्हटले आहे की, हे संपूर्ण लोकसंख्येचे सर्वेक्षण आहे. ते इन्फोसिसचे संस्थापक आहेत म्हणून त्यांना सगळंच माहिती आहे का? असा सवाल सिध्दरामय्या यांनी केला. केंद्र सरकारही असे सर्वेक्षण करणार नाही. तेव्हा ते काय करतील, असेही सिध्दरामय्या म्हणाले.
कदाचित त्यांना चुकीची माहिती दिली असावी, असा सांगत सिध्दरामय्या म्हणाले, सरकारने अनेकदा स्पष्ट केले आहे की, राज्यातील लोकसंख्येची सामाजिक आणि आर्थिक स्थिती स्पष्ट व्हावा, योग्य माहिती समोर यावी, यासाठी हे सर्वेक्षण केले जात आहे. हे सर्वेक्षण मागासवर्गाचे असल्याचा विचार सुधा मूर्ती आणि नारायण मूर्ती करत असतील, ते चुकीचे आहे.
दरम्यान, अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सर्वेक्षण करणारे कर्मचारी मूर्ती दाम्पत्याच्या घरी गेले होते. त्यावेळी त्यांनी आमचे सर्वेक्षण करू नये, असे सांगितले. आम्ही कोणत्याही मागासवर्गातील नाही. त्यामुळे या सरकारी सर्वेक्षणाशी काही देणेघेणे नाही. सुधा मूर्ती यांनी सर्वेक्षणाच्या फॉर्मवर याबाबत नमूद करून सहीही केल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून दिली जात आहे.
दुसरीकडे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनीही या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना हे सर्वेक्षण बंधनकारक नसल्याचे म्हटले आहे. आम्ही कुणालाही जबरदस्ती करत नाही. हे सर्वेक्षण ऐच्छिक आहे. कुणाला सहभाग घ्यायचा किंवा नाही, ही त्यांची इच्छा असल्याचे शिवकुमार यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.