

कर्नाटक काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना वेग आला आहे.
डी. के. शिवकुमार यांच्या निकटवर्तीयांनी १५ मे ही अंतिम तारीख असल्याचा दावा केला आहे.
या विधानामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
karnataka congress cm change news : गेल्या काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना पुन्हा एकदा उत आला आहे. नुकताच तब्बत ३० आमदारांनी बंडाचा पवित्रा घेत दिल्ली गाठत सरकारमध्ये फेरबदल करण्याची मागणी केली होती. तर मुख्यमंत्री सिद्धरामय्यांची खुर्ची धोक्यात असल्याचे बोलले जात आहे. आता तर एका काँग्रेस आमदारानेच थेट राज्याचा मुख्यमंत्री बदलणार असल्याची माहिती दिली असून तारीखच सांगितली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे निकटवर्तीय आणि रामनगरचे आमदार इक्बाल हुसेन यांनी याबाबत मोठा दावा करत राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी ‘१५ मे रोजी शिवकुमार राज्याचे नवे मुख्यमंत्री होतील, असा दावा केला आहे. त्यांनीच आता सरकार बदलाची ही अंतिम तारीख आहे’, असेही स्पष्टपणे सांगितले आहे. यामुळे काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना नवे वळण आले आहे.
रामनगर तालुक्यातील केतुहळ्ळी गावात बोलताना हुसेन म्हणाले, ‘याआधी दोन-तीन वेळा तारखा सांगितल्या होत्या. पण, यावेळी ठामपणे सांगतो की, १५ मे रोजी शिवकुमार मुख्यमंत्री बनतील. त्यांना सत्ता मिळावी ही केवळ माझी इच्छा नसून, अनेक आमदार आणि जनतेचीही अपेक्षा आहे.’’
वाढदिवशी ‘सीएम पद गिफ्ट’?
१५ मे हा शिवकुमार यांचा वाढदिवस आहे. त्याचदिवशी मुख्यमंत्रिपदाची शपथ मिळणार का, असा प्रश्न विचारल्यावर हुसेन म्हणाले, आमची सर्वांचीच ती इच्छा आहे. त्यांच्या वाढदिवशी सत्तेचे गिफ्ट मिळावे, ही अपेक्षा आहे. त्यांनी पक्षासाठी खूप कष्ट घेतले आहेत, त्यांचे नेतृत्व राज्याच्या विकासासाठी महत्त्वाचे आहे.
मंत्री सतीश जारकीहोळी आणि एच. सी. महादेवाप्पा यांच्या दिल्ली भेटीबाबत बोलताना हुसेन म्हणाले, ‘ते पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. हायकमांडला भेटणे यात काही चुकीचे नाही. ते राज्याच्या विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी किंवा वैयक्तिक बाबी मांडण्यासाठी गेले असतील.’’
1. कर्नाटकात सध्या कोणती चर्चा सुरू आहे?
मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना जोर आला आहे.
2. डी. के. शिवकुमार यांच्याबाबत काय दावा करण्यात आला आहे?
१५ मेपर्यंत ते मुख्यमंत्री होतील असा दावा करण्यात आला आहे.
3. हा दावा कुणी केला आहे?
रामनगरचे आमदार इक्बाल हुसेन यांनी हा दावा केला आहे.
4. या विधानाचा राजकीय परिणाम काय आहे?
यामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत तणाव आणि चर्चांना वेग आला आहे.
5. हा निर्णय निश्चित आहे का?
अधिकृत घोषणा झालेली नसून हा दावा राजकीय चर्चेचा भाग आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.