

राज्य सरकारच्या गृहलक्ष्मी योजनेतील लाभार्थी महिलांची पडताळणी प्रक्रिया सुरू झाली आहे.
सुरुवातीला ग्रामीण भागात e-KYC मोहीम राबवली जात असून अंगणवाडी सेविकांकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.
ग्रामीण सर्वे पूर्ण झाल्यानंतर शहरी भागातील लाभार्थ्यांची पडताळणी केली जाणार आहे.
Gruha Lakshmi Yojana Update : महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारने राज्यात सत्ता मिळवण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केली. त्यानंतर या योजनेची देशभर चर्चा झाली. यानंतर या योजनेला विविध निकष लावत त्याला कात्री लावली जात आहे. आता अशाच पद्धतीने कर्नाटकात महत्त्वाकांक्षी ठरलेल्या ‘गृहलक्ष्मी योजनेत’ कर्नाटक सरकार निकष लावण्याचे धोरण आखले असून या योजनेच्या लाभार्थी महिलांची पडताळणी केली जाणार आहे. यासाठी ई-केवायसी करण्याचे निर्देश सरकारने दिले असून हे काम अंगणवाडी सेविकांना करावे लागणार आहे. तसेच ग्रामीण भागातील ई-केवायसी पूर्ण झाल्यानंतर शहरी भागात लाभार्थ्यांची पडताळणी होणार आहे. या निर्देशानंतर आता कर्नाटकात खळबळ लडाली आहे.
राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी असणारी ‘गृहलक्ष्मी योजना’ राज्यात लोकप्रिय झाली असून या योजनेतून दरमहा ₹2,000 थेट बँक खात्यात जमा केले जातात. तर या योजनेचा मुख्य उद्देश हा कुटुंबातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे असून अर्जदार हा कर्नाटकचा रहिवासी असणे आणि आयकर/GST न भरणारा असावा अशा अटी आहेत. मात्र काही लाभार्थी महिलांचा मृत्यू झाला असून काहींच्या घरात दोन-तीन लाभार्थी असल्याचे खात्याच्या निदर्शनास आले आहे. यामुळे सुमारे वर्षभरापासून योजनेच्या अंमलबजावणी वरून बराच ऊहापोह सुरू आहे.
आता गृहलक्ष्मी लाभार्थी महिलांची पडताळणी करण्याचे काम सुरू झाले आहे. प्रारंभी ग्रामीण भागातील लाभार्थ्यांची ई केवायसी मोहीम सुरू करण्यात आली आहे. हे काम अंगणवाडी सेविकांवर सोपविले आहे. ग्रामीण भागातील सर्वे काम पूर्ण झाल्यानंतर शहरी भागात लाभार्थ्यांची पडताळणी होणार आहे. यासाठी सध्या गृहलक्ष्मी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना ई-केवायसी म्हणजेच अंगठ्याचे ठसे द्यावे लागणार आहेत.
ग्रामीण भागातील लाभार्थी महिलांच्या घरोघरी जाऊन अंगणवाडी सेविका संबंधित लाभार्थी महिलेची माहिती जाणून घेत असून त्यांनी दिलेला पत्ता, लाभार्थ्यांच्या कुटुंबाची माहिती, लाभार्थी हयात आहेत का? त्यांचे आधार आणि रेशनकार्ड याची चौकशी करत आहेत. तसेच त्यांच्याकडून ई केवायसी करून घेण्यात येत आहे. यामुळे लाभार्थी महिलांना आता आपली संपूर्ण माहिती द्यावी लागत आहे.
सध्या जिल्ह्यात लाखोंच्या संख्येने गृहलक्ष्मी योजनेच्या लाभार्थी महिला आहेत. मात्र, काही ठिकाणी योजनेचा गैरवापर सुरू आहे. योजनेच्या पात्र महिला अन्य पेन्शन योजनेचा लाभ घेत असल्याचे दिसत आहे. यामुळे आता लाभार्थी महिलांची नियमितपणे ई केवायसी करण्यात येत आहे. याप्रमाणे यापुढे गृहलक्ष्मी योजनेच्या लाभार्थ्यांना आता ई-केवायसी देणे बंधनकारक ठरण्याची शक्यता आहे.
गैरप्रकारांना आळा
याआधी दिव्यांग, विधवा, वृद्धाप, संध्या सुरक्षा, ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या विविध योजनांसाठी लाभार्थ्यांना ई-केवायसी बंधनकारक करण्यात आले आहे. याद्वारे योग्य लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळावा हा हेतू आहे. ही मोहीम आता गृहलक्ष्मी योजनेच्या लाभार्थीसाठी सुरू करण्यात आली आहे. यामुळे पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळण्याचा तसेच योजनेअंतर्गत होणारा गैरप्रकारावर आळा बसण्याची शक्यता खात्याकडून व्यक्त होत आहे.
1. गृहलक्ष्मी योजनेची पडताळणी का केली जात आहे?
योजनेचा लाभ फक्त पात्र महिलांनाच मिळावा यासाठी पडताळणी केली जात आहे.
2. गृहलक्ष्मी योजनेत e-KYC कधीपासून सुरू झाली आहे?
सध्या ग्रामीण भागात e-KYC मोहीम सुरू करण्यात आली आहे.
3. लाभार्थी पडताळणी कोण करत आहे?
अंगणवाडी सेविका व कार्यकर्त्यांकडून सर्वे व e-KYC केली जात आहे.
4. शहरी भागातील लाभार्थ्यांची तपासणी कधी होणार?
ग्रामीण भागातील पडताळणी पूर्ण झाल्यानंतर शहरी भागात तपासणी होणार आहे.
5. e-KYC न केल्यास गृहलक्ष्मी योजनेचा लाभ बंद होईल का?
पडताळणी पूर्ण न झाल्यास लाभात अडचण येण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.