

विनय कुलकर्णी यांचे आमदारपद हत्या प्रकरणात दोषी ठरल्यानंतर रद्द करण्यात आले.
त्यांना सहा वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली आहे.
धारवाड मतदारसंघात पोटनिवडणूक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
karnataka news : कर्नाटक राज्यातील काँग्रेस सरकारमध्ये सध्या मुख्यमंत्री बदलाचे वारे जोरदार वाहत असतानाच आता सरकारमध्ये फेरबदलाची मागणी केली जात आहे. यासाठी ३५ हून अधिक आमदारांनी बंडाचे निशान फडकावले आहे. यामुळे येथे काँग्रेस अंतर्गत कलहामुळे अडचणीच आल्याचे चित्र आहे. अशातच भाजप नेते योगेशगौडा गौडा हत्या प्रकरणात काँग्रेस आमदार विनय कुलकर्णी यांना जन्मठेपेची शिक्षा झाल्याने आणखी अडचणीत भर पडली आहे. आता तर कुलकर्णी यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. ज्यामुळे येथे पोटनिवडणूक लागणार असून राजकीय खळबळ उडाली आहे.
धारवाडमधील सप्तपूर भागातील एका जिममध्ये भाजपचे जिल्हा पंचायत सदस्य योगेशगौडा गौडा यांची १५ जून २०१६ रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यावेळी विनय कुलकर्णी हे राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांनी केला, मात्र गौडा यांच्या कुटुंबीयांनी सीबीआय तपासाची मागणी लावून धरली. ज्यानंतर या प्रकरणाचा तपास २०१९ मध्ये सीबीआयकडे सोपवण्यात आला.
या तापासानंतर सीबीआयने आपल्या आरोपपत्रात काँग्रेस नेते कुलकर्णी हेच या हत्याकांडाचे ‘मुख्य सूत्रधार’ असल्याचे म्हटले. तसेच राजकीय वादातून गौडा यांचा काटा कुलकर्णी यांनी काढला. त्यासाठी त्यांनी भाडोत्री मारेकऱ्यांचा वापर करत ही हत्या घडवून आणल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. तर कुलकर्णी यांना २०२० मध्ये अटक झाली. बंगळुरु येथील विशेष न्यायालयाने कुलकर्णी यांना हत्येच्या कटात दोषी ठरवले. न्यायालयाने कुलकर्णी यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून सध्या ते कारागृहात शिक्षा भोगत आहेत.
दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने त्यांना २०२१ मध्ये जामीन दिला होता, मात्र साक्षीदारांवर दबाव टाकल्याच्या आरोपावरून जून २०२५ मध्ये त्यांचा जामीन रद्द करण्यात आला होता. अखेर सर्व साक्षीदारांची साक्ष नोंदवून झाल्यानंतर फेब्रुवारी २०२६ मध्ये त्यांना पुन्हा जामीन मिळाला होता, पण आता पुन्हा कुलकर्णी यांना तुरुंगात जावे लागले आहे.
आता लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम ८ नुसार कुलकर्णी यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, जोपर्यंत उच्च न्यायालय त्यांच्या शिक्षेला स्थगिती देत नाही, तोपर्यंत त्यांची सुटका झाल्यानंतर पुढील सहा वर्षांसाठी त्यांना कोणतीही निवडणूक लढवता येणार नाही. कुलकर्णी यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याबाबत कर्नाटक विधानसभेने शनिवारी (ता.२) यासंदर्भात अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. यामुळे आता धारवाड विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली असून येथे पोटनिवडणूक लागणार आहे.
1. विनय कुलकर्णी यांचे आमदारपद का रद्द झाले
योगेशगौडा हत्या प्रकरणात दोषी ठरल्यानंतर त्यांचे आमदारपद रद्द करण्यात आले
2. त्यांना किती काळासाठी निवडणूक बंदी आहे
त्यांना सहा वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदी आहे
3. हा निर्णय कोणी घेतला
कर्नाटक विधानसभेने अधिकृत अधिसूचना जारी करून हा निर्णय घेतला
4. कोणता मतदारसंघ रिक्त झाला आहे
धारवाड विधानसभा मतदारसंघ रिक्त झाला आहे
5. पुढे काय होणार आहे
या मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.