Congress Political Crisis : काँग्रेसमध्ये नेतृत्व बदल? आमदाराच्या वक्तव्याने खळबळ; लवकरच ‘गुड न्यूज’

Karnataka Congress Leadership Change Row : कर्नाटक काँग्रेसमधील नेतृत्व बदलाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मंत्रिमंडळ फेररचनेच्या मागण्यांनाही जोर चढला आहे.
Congress MLA membership cancelled
Congress MLA membership cancelledSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. कर्नाटक काँग्रेसमध्ये नेतृत्व बदल आणि मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना जोर आला आहे.

  2. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांनी दिल्लीत वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली.

  3. आमदारांच्या बंडखोरीमुळे राज्याच्या राजकारणात अनिश्चितता वाढली आहे.

karnataka congress news : कर्नाटक काँग्रेसमधील नेतृत्व बदलाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मंत्रिमंडळ फेररचनेच्या मागण्यांनाही जोर चढला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार नवी दिल्लीला रवाना झाले होते. तेथे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

अशातच आता सागर मतदारसंघाचे आमदार गोपाळकृष्ण बेलूर यांनी दिल्लीचा दौरा फलदायी ठरल्याचा विश्वास व्यक्त करत पुढील दीड महिन्यात आनंदाची बातमी मिळेल, असे सांगितले. काही दिवसांपूर्वीच राज्यातील 30 आमदारांनी बंडाचे निशान फडकवत दिल्ली दौरा केला होता. तर ज्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. तर या आमदारांच्या दिल्ली दौऱ्यामुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांची खुर्ची धोक्यात असल्याचे बोलले जात होते.

सागर मतदारसंघाचे आमदार गोपाळकृष्ण बेलूर यांनी नवी दिल्ली दौरा फलदायी ठरल्याचा विश्वास व्यक्त करत पुढील दीड महिन्यात आनंदाची बातमी मिळेल, असे सांगितले. शिमोगा शहरात माध्यमांशी बोलताना त्यांनी वरिष्ठ आमदारांसह हायकमांडच्या भेटीसाठी दिल्लीला गेल्याचे सांगितले. या भेटीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी सुमारे दीड तास चर्चा झाली. खर्गेनी आमचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. आम्ही ३० जण दिल्लीला गेलो होतो, त्यापैकी २० जण मंत्रिपदाचे इच्छुक होते, असे त्यांनी स्पष्ट केले.

Congress MLA membership cancelled
Congress Political Crisis: बिहारमध्ये धुव्वा उडाल्यानंतर काँग्रेस समोर मोठं संकट, इंडिया आघाडीत फूट? 'हे' पक्ष बाहेर पडणार

दरम्यान, प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार आमच्यावर नाराज नसल्याचेही बेलूर यांनी सांगितले. शिवकुमार यांनी फक्त विधान करताना काळजी घ्या, असे सांगितले. त्यांनी आमच्याशी चर्चा केली असून, कोणतीही नाराजी नाही, असे ते म्हणाले. मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त करत त्यांनी सकारात्मक संकेत दिले.

महिला आरक्षण विधेयकाबाबत बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. ‘नारीशक्ती विधेयकाला आमचा पाठिंबा आहे, मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते आणणे योग्य नाही, असे ते म्हणाले. विधेयकावर स्वतंत्र अधिवेशनात सविस्तर चर्चा व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.

याचवेळी माजी मंत्री के. एन. राजण्णा यांच्या विधानांवर त्यांनी अप्रत्यक्ष टीका केली. ‘मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याबद्दल बोलणे योग्य नाही. राजण्णा हे आपले चांगले मित्र असल्याचे नमूद केले. दुसरीकडे, गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत प्रतिक्रिया देताना, ‘कोणताही निर्णय हायकमांडच घेते. मंत्रिमंडळ फेरबदल, मुख्यमंत्री बदल किंवा पात्रता याबाबत अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींचाच असतो’, असे स्पष्ट केले.

एकीकडे कर्नाटक काँग्रेसमधील नेतृत्व बदलाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असतानाच मंत्रिमंडळ फेररचनेच्या मागण्यांनाही जोर चढला आहे. अशातच मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिल्ली गाठली. तेथे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

पोटनिवडणुका संपताच काँग्रेसमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. मंत्रिमंडळ फेररचनेच्या मागणीसाठी सुमारे १५ हून अधिक वरिष्ठ आमदार चार दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिवकुमार यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन नेतृत्व बदलाबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करण्याची मागणी केली होती.

सूत्रांच्या माहितीनुसार, सिद्धरामय्या हे वरिष्ठ नेत्यांकडे मंत्रिमंडळ फेररचनेला परवानगी देण्याची मागणी करणार आहेत. तर, शिवकुमार हे ‘नेतृत्व बदलाचा प्रश्न निकाली काढल्याशिवाय फेररचना करू नये’ अशी भूमिका पुन्हा मांडणार असल्याचे सांगितले जाते.

Congress MLA membership cancelled
Congress Political Crisis : जयश्रीताई जाताच काँग्रेसला गळती? आता प्रदेश उपाध्यक्षच महायुतीच्या वाटेवर; शिंदे-पवार भेटीमुळे चर्चांना उधाण

FAQs :

1. कर्नाटकात नेतृत्व बदलाचा मुद्दा का चर्चेत आहे?
आमदारांच्या बंडामुळे आणि अंतर्गत मतभेदांमुळे हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

2. कोणते नेते दिल्लीला गेले होते?
मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार दिल्लीला गेले होते.

3. आमदारांच्या बंडामुळे काय परिणाम झाला?
राजकीय अस्थिरता वाढली असून नेतृत्व बदलाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

4. मंत्रिमंडळ फेरबदल होण्याची शक्यता आहे का?
होय, फेरबदलाच्या मागण्यांनाही जोर आला आहे.

5. पुढील काळात काय होऊ शकते?
पक्ष नेतृत्वाचा निर्णयानुसार मोठे राजकीय बदल होऊ शकतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com