
Sangli News : विधानसभा निवडणुकीवेळी भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या प्रा. मोहन वनखंडे पुन्हा एकदा महायुतीच्या वाटेवर आहेत. सध्या तशा तालुक्यात चर्चा सुरू झाल्या असून त्यांनी प्रवेशासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत भेट घेतल्याचेही बोललं जात आहे. तर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची त्यांनी भेट घेतल्याने ते शिवसेना किंवा राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी शक्यता आता वर्तावली जातेय. दरम्यान, प्रा. वनखंडे यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
आमदार सुरेश खाडे यांचे एकेकाळचे खंदे समर्थक असलेल्या मोहन वनखंडे यांनी खाडे यांच्याशी बिनसल्यानंतर भाजपमध्येच स्वतंत्र काम सुरू केले होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीअगोदर सर्वांनाच चकवा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. खाडे यांच्याशी विधानसभेला मैदानात उतरण्याचीही तयारी त्यांनी केली होती. मात्र, महाविकास आघाडीच्या जागावाटपात मिरजेची जागा शिवसेना (ठाकरे गट) वाट्याला गेल्याने खाडे यांच्याविरोधात तानाजी सातपुते यांनी निवडणूक लढवली होती.
महाविकास आघाडीमध्ये पर्यायाने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना प्रदेश उपाध्यक्षपदाची संधी देण्यात आली होती. तरी आघाडीमध्ये ते पूर्णपणे सक्रिय झालेच नाहीत. काँग्रेसमधील जिल्हास्तरावरील नेते सोबत घेत नाहीत, अशी खंतही त्यांनी अनेकदा बोलून दाखवली होती.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रा. वनखंडे यांनी पुन्हा महायुतीत जाण्याबाबत चाचपणी सुरू केली होती. त्यानुसार बुधवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्यांनी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी शिवसेना (शिंदे गट)चे नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली. त्यामुळे आता लवकरच ते महायुतीमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता आहे.
दरम्यान मिरज तालुक्यावर प्रभाव असलेल्या मदन पाटील गटाच्या जयश्री पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. त्यापाठोपाठ आता प्रा. वनखंडे यांनीही साथ सोडण्याची तयारी केल्याने आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाडीसमोर तुल्यबळ लढतीचे आव्हान असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.