
Maharashtra power project controversy : कर्जत राशीन मधील महाराष्ट्र वीज निर्मीती योजने अंतर्गत रॅनसन सोलर पल्स सोलर कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणे तसेच कामात कमिशन मागणे या प्रकरणाविषयी माझा काडीमात्र संबंध नाही. आमदार रोहित पवार यांनी केवळ राजकीय द्वेषातून माझ्यावर पावसाळी अधिवेशनात बिनबुडाचे आरोप केले. आमदार रोहित पवार यांच्या उमेदवारीची प्रथम मागणी करणारा राजकीय पदाधिकारी मी आहे. त्यावेळी मी त्यांना गुंड प्रवृत्तीचा आणि खंडणीखोर वाटलो नाही. सभापती प्रा. राम शिंदे यांच्याबरोबर आज राजकीय काम करीत असल्याने पवारांची माझ्या विषयी दृष्टी बदलली का? असा सवाल राशीनचे शंकरराव राजेभोसले ऊर्फ शहाजी याने पत्रकार परिषदेत केला.
शंकरराव राजेभोसले म्हणाला, "मी आजमितीस विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांच्यासोबत काम करीत आहे. कालच्या घटनेत माझा काही संबंध नसताना केवळ राजकीय द्वेष पुढे आणून माझी राजकीय कारकीर्द बदनाम करण्याचा प्रयत्न आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणात केला. त्यांनी पावसाळी अधिवेशनात सभागृहात औचित्य मुद्द्यात खंडणीखोर आणि गुंड प्रवृत्तीचा उल्लेख केला". वास्तविक पाहता त्यांच्या आमदारकीच्या उदयास याच शहाजी राजेभोसले यांनी खासदार शरद पवार यांच्याकडे मागणी केली होती, याचा विसर त्यांना पडला असावा, असा घणाघात राजेभोसले यांनी केला.
समोरच्या कंपनीने 15 कोटी रुपयांची खंडणी मागितली असल्याचा आरोप केला. ज्या व्यक्तीने माझ्यावर खोटी फिर्याद दाखल केली तो कंपनीचा वाहनचालक आहे. वाहन चालकांकडे 15 कोटी रुपये खंडणी कोणी मागू शकतो का? याची शहानिशा आमदार पवारांनी (Rohit Pawar) प्रथम करून, नंतर सभागृहात बोलायला हवे होते. केवळ राजकीय आकासापोटी त्यांनी राजेभोसले याच्यावर खोटा गुन्हा दाखल करायला लावला, असा गंभीर आरोप शंकरराव भोसले याने केला.
विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि माझ्या बदनामीचे षडयंत्र रचले. माझ्यावर सदरचा खोटा गुन्हा दाखल असताना आमदार पवारांनी केवळ राजकीय हेतू पुढे आणत बीड प्रकरणाशी त्याची तुलना करून बालिश आणि खुनशी राजकारण करण्याचा डाव टाकत आहे. माझ्या जागेत काम सुरू असताना आम्हीच ते काम कसे बंद पाडू याची जाणीव आमदार पवारांना नसणे याचे दुर्दैव वाटते, असेही राजेभोसले याने म्हटले.
आमदार पवार यांच्या मी म्हणेल ती पूर्व दिशा, या वृत्तीमुळे सोबतची माणसे दूर होत आहेत, याचे आत्मपरीक्षण एकदा त्यांनी करावे. प्रत्येकाच्या स्वतंत्र राजकीय भूमिका असतात. सोडून गेलेल्या माणसावर असा सूड काढणे त्यांच्या राजकीय व्यक्तिमत्वास शोभा देत नाही, असेही शंकरराव राजेभोसले याने म्हटले. आमदार पवारांनी माझ्या खोट्या प्रकरणात जेवढी तत्परता दाखवली. तेवढीच तत्परता त्यांनी शिंपोरा पुलाच्या प्रकरणात दाखवली असती, तर तेथील स्थानिक ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला असता, असेही शहाजी राजेभोसले याने म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.