Congress Politics : काँग्रेसमध्ये सत्तासंघर्ष? शिवकुमार यांचा सूचक इशारा; म्हणाले, 'ये अंदर की बात है!'

DK Shivakumar On Karnataka CM Post : कर्नाटक काँग्रेसमधील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचलेला असतानाच मध्यंतरी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार सकाळी सकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या निवासस्थानी पोहचत नाश्ता करत सत्तासंघर्षाला शांत करण्याचा प्रयत्न केला होता.
DK Shivakumar And CM Siddaramaiah
DK Shivakumar And CM Siddaramaiah Sarkarnama
Published on
Updated on
Summary
  • कर्नाटक काँग्रेसमध्ये सत्तावाटपाचा मुद्दा अद्याप स्पष्ट झालेला नाही.

  • उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार दिल्ली दौऱ्यावर असून राहुल गांधी यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

  • मुख्यमंत्रिपदाचा विषय हा काँग्रेस हायकमांड, सिद्धरामय्या आणि माझ्यातील अंतर्गत बाब असल्याचे शिवकुमार यांनी स्पष्ट केले आहे.

Karnataka Congress Political News : काँग्रेसमध्ये सत्तावाटपाचा मुद्दा अद्यापही धुसर असतानाच उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. या पार्श्वभूमीवर ते काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेऊन नेतृत्वबदलासंबंधी चर्चा करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. अशातच त्यांनी, मुख्यमंत्रीबदलासंबंधीच चर्चांवर थेट बोलताना, मुख्यमंत्रिपदाचा विषय हा माझ्या,काँग्रेस हायकमांड आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यातील अंतर्गत बाब आहे. त्यावर सार्वजनिकरित्या चर्चा करण्याची गरज नाही, असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे. यामुळे शिवकुमार मुख्यमंत्रिपदावर मौन का बाळगत असून त्यांच्याकडून नेतृत्वबदलावर पडदा टाकण्यात आला आहे की काय अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

कर्नाटकमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसमधील सत्तासंघर्ष उघड झाला होता. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्यातील अंतर्गत वाद उघडपणे समोर आल्याने कर्नाटकमध्ये सत्तेत खांदेपालट होणार अशा शक्यता वर्तवल्या जात होत्या. नोव्हेंबर 2025 मध्ये सिद्धरामय्यांना मुख्यमंत्रीपद भूषवून अडीच वर्षे पूर्ण झाल्यानंतर हा वाद सुरू झाला होता.

तर अंतर्गत समझोत्याअंतर्गत सिद्धरामय्या मुख्यमंत्रीपद सोडून ते डी.के. शिवकुमार यांच्याकडे सोपवतील, असे ठरल्याचे बोलले जात होते. मात्र काँग्रेस पक्षाने कधीही अधिकृतपणे “अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या फॉर्म्युल्याला” मान्यता दिल्याचा जाहीर उल्लेख केला नाही.

DK Shivakumar And CM Siddaramaiah
BJP-Congress Alliance : CM फडणवीसांनी काँग्रेससोबतची युती लगेचच तोडली; मग रवींद्र चव्हाणांनी 24 तासांत सर्व 12 नगरसेवकांच्या गळ्यात टाकला 'भाजपचा' गमछा

पण त्यानंतर अनेकदा या विषयावरून राज्यासह देशातील काँग्रेसचे राजकीय वातावरण तापवणाऱ्या चर्चा सुरू झाल्या. दरम्यान आसाम विधानसभा निवडणुकीसंदर्भात काँग्रेसच्या अखिल भारतीय काँग्रेस समितीने (एआयसीसी) बोलावलेल्या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी शिवकुमार शुक्रवारी (ता. १६) सकाळी बंगळूर येथून नवी दिल्लीला गेले.

यावेळी विमानतळावर पत्रकारांशी ते बोले. तेव्हा म्हैसूरमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. त्या वेळी मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा झाली का, असा प्रश्न त्यांना विचारला गेला. यावर त्यांनी भाष्य करण्यास स्पष्ट नकार दिला. तसेच ‘हे विषय सार्वजनिक चर्चेसाठी नाहीत’, असे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले.

आपण पक्षाच्या बैठकीसाठीच दिल्लीला आलो असून राहुल गांधींसह पक्षातील वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याचा माझा प्रयत्न असेल. त्यांनी वेळ दिल्यास चर्चा होईल. काही सिंचन प्रकल्पांशी संबंधित कायदेशीर बाबी आहेत. त्यावर चर्चा करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांची भेट घेईन, असे सांगितले.

आसाम निवडणुकीतील पक्षाच्या रणनीतींबाबत त्यांनी सांगितले की, पक्षाची निवडणूक रणनीती सार्वजनिकपणे जाहीर करता येत नाही. ही बाब पक्षाच्या अंतर्गत पातळीवरच चर्चिली जाते. याबाबत माहिती द्यायची असल्यास आमचे पक्षाचे सरचिटणीस अधिकृतपणे माहिती देतील.

दरम्यान तीन दिवसांपूर्वी राहुल गांधी म्हैसूर दौऱ्यावर असताना तेथील विमानतळावर सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांनी त्यांची भेट घेतली होती. त्या वेळी राहुल गांधी यांनी ‘दोघेही दिल्लीला या, सर्व मुद्द्यांवर चर्चा करू’, असे सांगितल्याचे समजते. आसाम विधानसभा निवडणुकीसंदर्भात काँग्रेसची महत्त्वाची बैठक होणार असून आसामचे निवडणूक निरीक्षक म्हणून शिवकुमार यांची बैठकीस उपस्थिती राहणार आहे.

DK Shivakumar And CM Siddaramaiah
Congress vs CM Fadnavis : काँग्रेस सर्वात मोठा प्रहार करणार; CM फडणवीसांविरुद्ध हक्कभंग आणणार,काय आहे कारण?

FAQs :

1. डी. के. शिवकुमार दिल्ली दौऱ्यावर का गेले आहेत?
काँग्रेस नेतृत्वाशी चर्चा करण्यासाठी ते दिल्ली दौऱ्यावर गेले असल्याची शक्यता आहे.

2. राहुल गांधी यांची भेट होणार आहे का?
होण्याची शक्यता वर्तवली जात असून यावर अधिकृत माहिती अद्याप नाही.

3. मुख्यमंत्रिपदावर शिवकुमार यांचे मत काय आहे?
हा विषय अंतर्गत असून सार्वजनिक चर्चेची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

4. कर्नाटक काँग्रेसमध्ये नेतृत्वबदल होणार आहे का?
सध्या यावर कोणताही अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही.

5. सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यात वाद आहे का?
सार्वजनिकरित्या वाद नाकारण्यात आला असून हा विषय अंतर्गत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com