Love Jihad Case : धक्कादायक! ‘लव्ह जिहाद’च्या भीतीने अल्पवयीन मुलीची आत्महत्या, दोघांना अटक; पोलिस निरीक्षक निलंबित

Dharwad Love jihad Minor Suicide Case : धारवाडमधील हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर विविध हिंदुत्ववादी संघटनांनी संताप व्यक्त केला आहे.
Dharwad Love Jihad Case
Dharwad Love Jihad Casesarkarnama
Published on
Updated on

Karnataka Crime News : अल्पवयीन मुलीने कथित ‘लव्ह जिहाद’ प्रकरणामुळे आत्महत्या केल्याच्या आरोपांनंतर धारवाड जिल्हा पोलिस प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात कर्तव्यात कसूर आणि निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गरग मंडळचे मंडळ पोलिस निरीक्षक (सीपीआय) शिवयोगी लोहार यांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक गुंजन आर्या यांनी याबाबत निलंबनाचे आदेश जारी केले आहेत. या प्रकरणामुळे धारवाड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

दरम्यान, या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींची नावे नईम बेग जोरम्मनावर (वय २५) आणि सोहेल मुल्ला (२२) अशी आहेत. दोघांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा नोंदवून तपास सुरू आहे.

मृत मुलीच्या पालकांनी आरोप केला आहे की, मुलगी काही काळापासून मानसिक तणावाखाली होती आणि संबंधित प्रकरणात तिला न्याय मिळाला नाही. पोलिसांनी योग्य ती कारवाई करण्याऐवजी तडजोडीचा मार्ग अवलंबण्याचा प्रयत्न केल्याने मुलीने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोपही केला आहे. प्रकरण उघडकीस आल्यानंतर विविध हिंदुत्ववादी संघटनांनी संताप व्यक्त केला आहे.

Dharwad Love Jihad Case
Pune Love Jihad Case : 'लव्ह जिहाद'ची तक्रार दाखल केली अन् पुणे महापालिकेने पीडितेच्याच घरी अनधिकृत बांधकामाची नोटीस धाडली!

विशेषतः बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या कथित निष्काळजीपणाविरोधात आंदोलन छेडले. संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.

Dharwad Love Jihad Case
Nitesh Rane ON Love Jihad: शाहरुख खानचे चित्रपट पाहून लव जिहादची प्रकरणं वाढायची! भाजप मंत्र्यांच वादग्रस्त विधान

अधिकाऱ्यांवर कारवाई शक्य

घटनेची गंभीरता लक्षात घेऊन जिल्हा पोलिस प्रशासनाने अंतर्गत चौकशी सुरू केली आहे. तपासात निष्काळजीपणा किंवा कर्तव्यात कसूर आढळल्यास आणखी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com