
Karnataka Deputy CM Stumbles While Entering Assembly : काँग्रेसचे संकटमोचक आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे मंगळवारी सायकलवरून विधानसभेत दाखल झाले. त्यासाठी त्यांनी जोरदार तयारी केली होती. पोलो शर्ट, ट्रॅक पॅन्टमध्ये ते सायकलवर स्वार होत विधानसभेच्या दारात पोहचले. पण या संपूर्ण सायकल सवारीचा शेवट शिवकुमार यांच्यासाठी नकोसा ठरला.
अनेक राजकीय नेत्यांकडून जनतेला आकर्षित करण्यासाठी किंवा पर्यावरणाप्रती आपली बांधिलकी दाखविण्यासाठी सायकलवरून प्रवास करतानाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियात पोस्ट करत असतात. डीके शिवकुमार हेही त्यामध्ये मागे राहिले नाहीत. जागतिक पर्यावरण दिनाचे निमित्त साधत त्यांनी मंगळवारी सायकल फेरी मारली.
शिवकुमार हे आज पोलो शर्ट, ट्रॅक पॅन्टवर दिसून आले. नियोजनाप्रमाणे त्यांनी सायकल स्वारी विधानसभेपर्यंत आली. व्हिडीओ शुटिंग, फोटो शुटिंग सगळं काही सुरू होते. पण नको ते घडले. विधानसभेच्या पायऱ्यांजवळ सायकल थांबवत असतानाच त्यांचा तोल गेला आणि सायकलसह तेही पडले. सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. शेजारीच असलेल्या सुरक्षारक्षक व इतर लोकांनी त्यांना उचलले.
शिवकुमार यांच्याकडून लोकांना पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यासाठी सायकलस्वारी करण्यात आली. पण विधानसभेच्या दारातच ते पडल्याने हाच व्हिडीओ आणि फोटो आता सोशल मीडियात व्हायरल होत आहे. त्यांच्या समर्थकांकडून सायकल स्वारीचे कौतुक होत असताना विरोधकांकडून मात्र त्यांची खिल्ली उडवली जात आहे. शिवकुमार यांची ही स्टंटबाजी फसल्याचे नेटकरी म्हणत आहेत.
शिवकुमार यांनीही सोशल मीडियात सायकल चालवतानाचा केवळ फोटो पोस्ट केला आहे. ‘सत्तेच्या वर्तुळात, मी सायकल निवडली – कारण प्रगतीसाठी नेहमीच घोड्याच्या ताकदीची गरज नसते, लोकशक्ती पुरेशी असते,’ असे कॅप्शन त्यांनी दिले आहे. व्हिडीओ पोस्ट करणे त्यांनी या घटनेमुळे टाळले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.