Karnatak Election : कर्नाटकसाठी भाजपचा मेगा प्लॅन : 40 स्टार प्रचारकांसह उतरणार मैदानात !

Karnatak Assembly Election : प्रचारासाठी भाजपचे सूक्ष्म नियोजन...
Karnatak Election :
Karnatak Election :Sarkarnama
Published on
Updated on

Karnataka Assembly Bjp Rally : देशाच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये कर्नाटक हे एकमेव राज्य आहे जिथे भाजपची सत्ता आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे (Karataka Bjp) नेते निवडणूक प्रचारात आपली पूर्ण ताकद पणाला लावण्याच्या तयारीत आहेत.

विधानसभा निवडणुका जिंकून सत्ता टिकवण्याचा भाजप प्रयत्नात आहे. वृत्तसंस्था एएनआयला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात नवी दिल्लीत एक मोठी बैठक होणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (J P Nadda) यांनी पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसांची ही बैठक बोलावली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपने कर्नाटकात प्रचारासाठी तमिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्राचा समावेश असलेल्या शेजारील राज्यांतील नेत्यांना पाठवण्याचा निर्णयही घेतला आहे. 'भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची (CEC) बैठकही ५ ते ६ एप्रिलच्या सुमारास होणार आहे. या दरम्यान उमेदवारांची नावे अंतिम असतील. यासोबतच भाजप पक्ष कर्नाटकात कॉर्पोरेट सभांचा धडाका लावण्याच्या तयारीत आहे. या दक्षिणेकडील राज्यासाठी आतापर्यंत ४० स्टार प्रचारकांची निश्चिती करण्यात आली आहे.

Karnatak Election :
Hingoli Loksabha News : खासदार पाटील यांना आधी उमेदवारीसाठी अन् मग विजयासाठी झगडावे लागणार..

भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी तयार :

एएनआयच्या अहवालात कर्नाटक निवडणुकीसंदर्भात भाजपच्या स्टार प्रचारकांच्या नावांचाही उल्लेख आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश आहे. याशिवाय केंद्रीय मंत्र्यांमध्ये राजनाथ सिंह, स्मृती इराणी आणि निर्मला सीतारामन यांची नावे आहेत. या यादीतील प्रत्येक नेत्याला कर्नाटकात 2 आठवड्यांचा वेळ देण्यास सांगण्यात आले आहे.”

अनेक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाऊ शकते :

बीएस येडियुरप्पा हे पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून प्रमुख भूमिका निभावतील. 224 सदस्यीय कर्नाटक विधानसभेत भाजपप्रणित आघाडीचे 119 आमदार आहेत. मात्र यावेळी अनेक विद्यमान आमदारांची तिकिटे कापली जाणार आहेत.

40 टक्के विद्यमान आमदारांचे तिकीट कापून नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते, असे सांगण्यात येत आहे. जनता दल (धर्मनिरपेक्ष) सोबत कोणताही करार नाही. यावेळीही भाजप संपूर्ण निवडणूक पंतप्रधान मोदींच्या चेहऱ्यावर आणि डबल इंजिन सरकारच्या विकास मॉडेलवर लढणार असल्याचे बोलले जात आहे.

Karnatak Election :
Satara News : अजिंक्यतारा, सज्जनगडावर होणार 'रोप वे'; शिवेंद्रराजेंसह अधिकाऱ्यांनी केली पहाणी

पंतप्रधान मोदींचा निवडणूक दौराही सुरू होणार आहे :

“आम्ही कर्नाटकातील लोकांना सांगू की रस्ते, रुग्णालये, ओव्हर ब्रिज भाजप सरकारने बांधले आहेत. केंद्र सरकारच्या योजनांचा लाभही सर्वांपर्यंत पोहोचवला आहे. राज्यात विकासासाठी दुहेरी इंजिनचे सरकार आवश्यक असल्याचे भाजप कर्नाटकातील जनतेला सांगण्याचाप्रयत्न करेल. भाजपचे सर्वात मोठे स्टार प्रचारक पंतप्रधान मोदी यांचा निवडणूक दौरा ८ ते १० एप्रिल दरम्यान सुरू होणार आहे. ते म्हैसूरच्या नॅशनल पार्कमध्ये रॅली काढणार आहेत.

कर्नाटकात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे :

10 मे रोजी कर्नाटकातील सर्व 224 विधानसभा जागांसाठी मतदान होणार आहे. 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी गेल्या बुधवारी राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. 13 एप्रिल रोजी विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात येणार असून, उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 20 एप्रिल असल्याची माहिती त्यांनी दिली. 24 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. राज्यात 10 मे रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार असून 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com