Satara News : अजिंक्यतारा, सज्जनगडावर होणार 'रोप वे'; शिवेंद्रराजेंसह अधिकाऱ्यांनी केली पहाणी

Shivendraraje Bhosale एकदा किल्ले अजिंक्यताऱ्यावर रोप वे ने गेलेला पर्यटक पुढे सांबरवाडीतून सज्जनगडावर जाईल. त्याच 'रोप वे' नेच पुन्हा वाहनतळापर्यंत येईल.
Shivendraraje Bhosale
Shivendraraje Bhosalesarkarnama
Published on
Updated on

Ajinkyatara Rope Way : पर्यटनवाढीला चालना मिळावी आणि वयस्क पर्यटक व भाविक यांना अजिंक्यतारा व प्रामुख्याने सज्जनगडावर येणे- जाणे सुलभ व्हावे, यासाठी अजिंक्यतारा व सज्जनगडावर 'रोप वे' सुविधा करण्यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले Shivendraraje Bhosale यांचा पाठपुरावा सुरु आहे. या दोन्ही किल्ल्यांवर 'रोप वे' करण्याच्यादृष्टीने त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत आज पाहणी केली. पाहणीनंतर तज्ञ अधिकाऱ्यांमार्फत लवकरच सर्वेक्षण करण्याचा निर्णय यावेळी झाला.

निसर्गसौंदर्याने नटलेल्या सातारा शहर आणि सातारा तालुक्याला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. सातारा शहरालगत ऐतिहासिक किल्ले अजिंक्यतारा असून परळी लगत सज्जनगड हे ऐतिहासिक, धार्मिक पर्यटनस्थळ आहे. सज्जनगडावर असंख्य पर्यटकांसह हजारो भाविकांची दररोज गर्दी असते. यामध्ये वयस्क लोक, महिलांचा मोठा सहभाग असतो.

पर्यटक आणि खास करून वयस्क भाविकांची सोय व्हावी, सर्वांचा वेळ आणि त्रास वाचावा यासाठी सज्जनगडावर आणि किल्ले अजिंक्यतारावर रोप वे आवश्यक आहे. हे ओळखून आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी 'रोप वे' साठी शासनस्तरावर पाठपुरावा चालू केला आहे. त्यांच्या मागणीनुसार 'रोप वे' संदर्भाने आज परिसराची पाहणी करण्यात आली.

Shivendraraje Bhosale
Satara News : २०२४ ला पुन्हा भाजपचीच सत्ता येणार; माझ्यासहित चौघे आमदार होणार...

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (पुणे) प्रकल्प संचालक संजय कदम, सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट आदी अधिकाऱ्यांनी पाहणी केली. चार भिंती, किल्ले अजिंक्यतारा येथे पाहणी करून वाहनतळ कोठे करता येईल, याची चाचपणी केली. चार भिंतीच्या खाली शाहूनगर अथवा कुर्णेश्वर येथे वाहनतळ करून तेथून किल्ले अजिंक्यताऱ्यावर 'रोप वे' करणे.

Shivendraraje Bhosale
Satara Market Committee Election: राष्ट्रवादी विरूद्ध भाजप, शिवसेनेचे स्थानिक गट झुंजणार

अजिंक्यताऱ्यावरून सांबरवाडी येथे रोप वे आणि तिथून सज्जनगडावर रोप वे करणे अशी प्राथमिक चर्चा झाली. एकदा किल्ले अजिंक्यताऱ्यावर रोप वे ने गेलेला पर्यटक पुढे सांबरवाडीतून सज्जनगडावर जाईल. त्याच 'रोप वे' नेच पुन्हा वाहनतळापर्यंत येईल, अशा पद्धतीने 'रोप वे'चा मार्ग ठेवायचा कि वेगवेगळे 'रोप वे' करायचे याचा निर्णय तज्ञ अधिकाऱ्यांच्या पाहणीनंतर घेण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच तज्ञ अधिकाऱ्यांच्या पथकामार्फत 'रोप वे' साठी सर्वेक्षण केले जाणार आहे. सातारकरांचे 'रोप वे'चे स्वप्न सत्यात उतरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Shivendraraje Bhosale
Patan : शंभूराज देसाई कार्यकर्त्यांना घडवताहेत विमान प्रवास....

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com