Rahul Gandhi
Rahul Gandhi sarkarnama

Karnataka EC: "अपात्र मतदारांची माहिती द्या, कार्यवाही करु"; स्फोटक पत्रकार परिषदेनंतर कर्नाटकच्या निवडणूक अधिकाऱ्यांचं राहुल गांधींना पत्र

Karnataka EC: शपथपत्रावर राहुल गांधींनी त्या अपात्र मतदारांची माहिती द्यावी, त्यावर पुढील कार्यवाही करता येईल असं कर्नाटकच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
Published on

Karnataka EC: लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेत भारतात विविध निवडणुकांमध्ये मतांची चोरी झाल्याचा आरोप केला. हा आरोप ते सातत्यानं करत असले तरी आज त्यांनी आपल्या यंत्रणेनं केलेल्या मतदार याद्यांच्या पडताळणीतून समोर आलेली आकडेवारी देखील सादर केली. यामध्ये त्यांनी कर्नाटकातील मतदारसंघामधला बोगस मतदारांचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर तातडीनं कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी राहुल गांधींना पत्र लिहिलं आणि यावर पुढील कार्यवाहीसाठी सविस्तर माहिती देण्याची विनंती केली.

निवडणूक अधिकाऱ्याचं पत्र

कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं की, निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, जर एखाद्या व्यक्तीनं मतदार यादीच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं तर त्या व्यक्तीला याचा तपशील लिखित प्रतिज्ञापत्राच्या स्वरुपात द्यावा लागतो. त्यामुळं राहुल गांधींनी घेतलेल्या आक्षेपांवर त्यांनी नियम 20(3)(b) अंतर्गत प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करुन त्या मतदारांची नाव उपलब्ध करुन द्यावीत. यामुळं त्यांनी केलेल्या दाव्यांची चौकशी करुन गरज पडल्यास कायदेशीर कारवाई देखील सुरु करता येईल.

Rahul Gandhi
Rahul Gandhi: ओपिनियन, एक्झिट पोलचे अंदाज कसे चुकतात? निवडणूक आयोग टार्गेट; राहुल गांधींनी आकडेवारी सादर करत केली पोलखोल

राहुल गांधींनी काय केला होता आरोप?

राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत आरोप केला होता की, महाराष्ट्र, कर्नाटक आणि इतर राज्यांतील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरफार झाले आहेत. यांमध्ये लाखो अशी नावं टाकण्यात आली आहेत जी अयोग्य आहेत. तर लाखो योग्य मतदारांची नावं या याद्यांमधून वगळण्यात आली आहेत. राहुल गांधींनी याला मतांची चोरी असं संबोधलं आहे. तसंच म्हटलं की, निवडणूक आयोगाची निष्पक्षता आणि विश्वसनीयतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com