
Rahul Gandhi: भारतात निवडणूक आयोगाच्या मदतीनं भाजपनं निवडणुका चोरल्या असल्याचा आरोप पुन्हा एकदा लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत थेट प्रेझेंटेशन देत त्यांनी दावा केला की, आमच्या यंत्रणांकडून करण्यात आलेल्या पडताळणीत विविध विधानसभा निवडणुकांमध्ये मतांची चोरी करण्यात आल्याचं उघड झालं आहे. त्यामुळं निवडणूक निकालांबाबत तज्ज्ञांनी व्यक्त केलेली मतं, एक्झिट पोल्सचे अंदाजही कसे काय चुकतात? असा सवाल करताना भाजपकडून निवडणुका जिंकत असल्याची वातावरण निर्मिती केली जात असल्याचा दावाही त्यांनी केला.
बोगस मतदार मतदार याद्यांमध्ये कसे दाखल झाले हे सांगताना राहुल गांधी म्हणाले, निवडणूक आयोगानं आम्हाला डिजिटल डेटा दिला नाही तर सात फूंट उंच कागदांच्या गठ्ठ्यांची चळत तयार होईल असा डेटा दिला. त्यातही आम्ही एका एका अर्जावर काम करुन यातले घोटाळे शोधून काढले. आम्हाला संशय होता की, काहीतरी काळंबेरं होत आहे. भाजपला अँटिइम्कब्सीचा फटका बसत नव्हता.
ओपिनियन आणि एक्झिट पोल्स वेगळंच काहीतरी दाखवत होते आणि प्रत्यक्षात निकाल वेगळेच येत होते. हरयाणा, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशची उदाहरण आपल्यासमोर आहेत. यामध्ये असं वातावरण तयार केलं जायचं की, लाडकी बहीण, पुलवामा, ऑपरेशन सिंदूर अशा प्रकारची उदाहरण दिली जायची. यातून नॅरेटिव्ह तयार केलं जायचं. त्यानंतर निवडणूक आयोग वेगळं शेड्युल बनवायचा. पण आता ईव्हीएम असतानाही निवडणुका घ्यायला महिने लागतात. उत्तर प्रदेशात पाच टप्प्यात निवडणुका होतात,
महाराष्ट्रातून आम्हाला संशय आला की, महाराष्ट्रात लोकसभेला आम्ही जिंकतो आणि विधानसभेला आमची वाट लागते. यामध्ये १ कोटी लोक लोकसभेला नाहीतर विधानसभेला मतदान करतात. निवडणूक आयोग म्हणतं की साडेपाच वाजता मोठ्या प्रमाणावर मतदान झालं पण आमचे पोलिंग एजंट सांगतात की, आजिबात गर्दी नव्हती. त्यामुळं काहीतरी चुकीचं घडत असल्याचं आम्हाला कळलं. त्यानंतर आमच्याकडं पुरावे नव्हते म्हणून आम्ही थोडसं दबकून बोलत होते त्यामुळं आम्ही आमचीच पडताळणी सुरु केली. आम्ही याबाबत निवडणूक आयोगाकडं विचारणा केली, त्यानंतर वृत्तपत्रांमध्ये लेख लिहिला. पण निवडणूक आयोग आमची मदत करत नव्हे तर त्यावर ते कारणं सांगत होते. आम्ही त्यांना इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये मतदार याद्या मागितल्या पण त्यांनी आम्हाल दिलं नाही. उलट सात फूट पेपरच्या याद्यांचे गठ्ठे दिले. तसंच हार्डडिस्कमधील सीसीटीव्ही फुटेज, मतदार याद्या त्यांना डिलिट करायच्या होत्या हे त्यांनी जाहीरही केलं.
आम्ही निवडणूक डेटाची पडताळणी केल्यानंतर त्यात दिसलं की, आदित्य श्रीवास्तव नावाच्या एका व्यकीचं कर्नाटक, युपी आणि महाराष्ट्रातील मतदान यादीत नाव होतं. त्याचबरोबर एकाच कुटुंबात ८० मतदारांची नोंद करण्यात आली आहे. पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदारांनी मोदींना निवडून दिलं असं वारंवार सांगितलं गेलं. पण एका ७० वर्षांच्या महिलेचा समावेश फर्स्ट टाईम व्होटर म्हणून केला गेल्याचं राहुल गांधींनी प्रत्यक्ष मतदार यादीतून दाखवून दिलं. तसंच अशा प्रकारे अनेक बनावट मतदारांनी पहिल्यांदाच मतदान केल्याचा दावा केला गेल्याचंही त्यांन म्हटलं.
राहुल गांधींनी एका मतदाराचा उल्लेख करताना म्हटलं की, गुरकीरत सिंग डांग नावाची एक व्यक्ती आहे. हा एक डुप्लिकेट मतदार आहे. या प्रकारचे ११,९६५ मतदार आहेत. गुरकीरत सिंग डांग यांचं नाव हे एकाच मतदारसंघातील चार वेगवेगळ्या मतदान केंद्रांवरील यादीत नाव आहे. एकदा, दोनदा, तीन वेळा, चार वेळा ते या यादीत दिसतात. वेगवेगळ्या मतदान केंद्रांसाठी तेच नाव, तोच पत्ता, तीच व्यक्ती आहे. ही फक्त एक व्यक्ती नाही, असे एकाच विधानसभेत हजारो लोक आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.