Karnataka Election : BJP उमेदवाराची JDS च्या उमेदवाराला धमकी ; Audio Clip व्हायरल ; अर्ज मागे घ्या, अन्यथा..

Karnataka Election 2O23 : क्लिपमुळे कर्नाटकचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
Karnataka Election 2O23
Karnataka Election 2O23 Sarkarnama
Published on
Updated on

Karnataka Election : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षाचा जोरदार प्रचार सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक स्टार प्रचारक मैदानात उतरले आहेत. या दरम्यान एक ऑडियो क्लिप व्हायरल होत आहे. या क्लिपमुळे कर्नाटकचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ही ऑडियो क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

चमराजनगर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार व्ही सोमना यांनी जेडीएसचे उमेदवार मल्लिकार्जुन स्वामी यांना फोनवरुन धमकवत असल्याचे उघडकीस आले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ते दबाब आणत असल्याचे दिसते. "उमेदवारी अर्ज मागे घ्या, तुम्हाला पैसा, सरकारी गाडी देतो," असे ते सांगत असल्याचे ऑडियो क्लिपमध्ये सांगत आहे.

Karnataka Election 2O23
Dharangaon Bazar Samiti Election : गुलाबराव पाटलांची होमपीचमध्ये जोरदार बॅटींग ; धरणगावात आठ जागांवर..

या क्लिपची मुख्य निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १० मे रोजी निवडणूक होत आहे. १३ मे रोजी निकाल आहे. एकूण २२४ जागासाठी एकाच टप्प्यात हे मतदान होत आहे. या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत होत आहे.

जेडीएस या निवडणुकीत 'किंगमेकिंग'ठरणार आहे. जेडीएसने २०१८ मध्ये काँग्रेसच्या सत्ता स्थापनेत किंग मेकरची भूमिका बजावली होती. यंदाच्या निवडणुकीत जेडीएस किंग मेकरची भूमिका बजावणार असल्याचे चित्र आहे.

Karnataka Election 2O23
Kolhapur Bazar Samiti Result : कोल्हापुरातील पहिला निकाल जाहीर ; हमाल गटातील बाबुराव खोत विजयी

जेडीएसचे नुकतेच आपले घोषणापत्र (Manifesto) जाहीर केले आहे. माजी मुख्यमंत्री, विधीमंडळातील जेडीएसचे नेते एचडी कुमारस्वामी यांनी बैंगलुरु येथे पक्षाचे नऊ सुत्री घोषणापत्र जाहीर केले. गर्भवती महिलांसाठी सहा महिन्यापर्यंत दरमहा सहा हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. राज्यातील महिला बचत गटाचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन जेडीएसने मतदारांना दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com