Siddaramaiah : सिध्दरामय्या यांना पुढील दहा दिवसांत फिरवावी लागणार चक्रं

MUDA Scam Congress Politics High Court : सिध्दरामय्या यांनी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे.
Siddaramaiah
SiddaramaiahSarkarnama
Published on
Updated on

Karnataka : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांना कथित MUDA घोटाळाप्रकरणी काहीसा दिलासा मिळाला आहे. हायकोर्टाने सोमवारी त्यांच्याविरोधात खटला चालवण्यास तात्पुरती स्थगिती दिली आहे. विशेष न्यायालयात त्यांच्याविरोधात 29 ऑगस्टपर्यंत खटला चालवू नये, असे आदेश हायकोर्टाने दिले आहे.

सिध्दरामय्या यांच्याविरोधात म्हैसूर नगरविकास प्राधिकरण जमीन वितरण घोटाळाप्रकरणी विशेष कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. हे खटले चालविण्यास राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी नुकतीच मान्यता दिली आहे. त्याविरोधात सिद्धरामय्या यांनी कर्नाटक हायकोर्टात धाव घेतली आहे.

Siddaramaiah
Video Sudha Murty : रक्षाबंधनाचा संबंध मुघलांशी; सुधा मूर्ती सोशल मीडियात ट्रोल

कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान सिध्दरामय्या यांच्या बाजूने काँग्रेसचे नेते व ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली. कर्नाटकात लोकांनी निवडून दिलेले सरकार आहे. रस्त्यावरील कुणीही तक्रार घेऊ येऊ शकतात. मुख्यमंत्र्यांविरोधातील तक्रार संबंधित घटनेनंतर दशकांनी करण्यात आली आहे. आणि राज्यपालांनीही त्याला मान्यता दिली, असे सिंघवी कोर्टात म्हणाले.

कॅबिनेटने राज्यपालांन शंभर पानी कागदपत्रे दिली आहेत. तक्रार योग्य नसल्याने खटला चालवण्यास मान्यता देऊ नये, अशी शिफारस कॅबिनेटने केली आहे. त्यावर राज्यपालांनी केवळ एकाच मुद्याच्या आधारे मान्यता दिली. पण त्याचे कारण त्यांनी दिलेले नाही, असा दावा सिंघवी यांनी कोर्टात केला. सिध्दरामय्या यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने विशेष न्यायालयात 29 तारखेपर्यंत याचिकेवर कोणताही कार्यवाही न करण्याचे आदेश दिले. या दिवशी पुढील सुनावणी होणार असल्याचे हायकोर्टाकडून स्पष्ट करण्यात आले.

Siddaramaiah
Assembly Election 2024 : भाजप 2 डझन आमदारांचे तिकीट कापणार; सर्व्हेने वाढवली चिंता

दरम्यान, भाजपने सिध्दरामय्या यांच्याविरोधात मोहीम उघडली असून राज्यभर आंदोलन केले जात आहे. संसदेतही भाजपच्या खासदारांनी आंदोलन केले जात आहे. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची मागणी भाजपकडून केली जात आहे. मात्र, काँग्रेस नेतृत्वाने सिध्दरामय्या यांच्यावर विश्वास दाखवला आहे.  

काय आहे प्रकरण?

टी जे अब्राहम, प्रदीप कुमार एस पी आणि स्नेहमयी कृष्णा या तीन सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखल केलेल्या अर्जाच्या आधारे सिद्धरामय्या यांच्याविरोधात खटल्याला परवानगी देण्यात आली.

सिद्धरामय्या यांच्या पत्नी पार्वती यांची 3 एकर सोळा गुंठे जमीन ‘मुडा’ने संपादित केली होती. त्याबदल्यात त्यांना मोठा लाभ मिळवून दिल्याचा आरोप आहे. 2020 मध्ये ही योजना बंद करण्यात आली. 2009 ते 2020 या काळात या योजनेत चार ते पाच हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा भाजपचा आरोप आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com