Video Sudha Murty : रक्षाबंधनाचा संबंध मुघलांशी; सुधा मूर्ती सोशल मीडियात ट्रोल

Raksha Bandhan Humayun : रक्षाबंधन सणाचे महत्व सांगणारा एक व्हिडिओ सुधा मूर्ती यांनी सोशल मीडियात पोस्ट केला आहे.
Sudha Murty, Raksha Bandhan
Sudha Murty, Raksha BandhanSarkarnma
Published on
Updated on

New Delhi : राज्यसभेच्या खासदार, लेखिका सुधा मूर्ती यांनी रक्षाबंधन सणाचा संदर्भ मुघल सम्राटाशी जोडल्याने वाद निर्माण झाला आहे. रक्षाबंधन आणि राखी हा माझ्यासाठी महत्वाचा सण आहे. कठीण काळात भावाने आपली मदत करावी, या भावनेतून बहीण राखी बांधते, असे सांगताना सुधा मूर्ती यांना या सणाचा संबंध मुघल साम्राज्याशी जोडला आहे.

एका व्हिडिओच्या माध्यमातून सुधा मूर्ती यांनी म्हटले आहे की, राणी कर्णावती अडचणीत असताना तिने मुघल साम्राज्याचा राजा हुमायुला एक धागा पाठवला. अडचणीत असलेल्या बहिणीचे संरक्षण करा, असा संदेश दिने पाठवला होता. हुमायूनला हा धागा नेमका कशासाठी आहे, हे कळाले नाही. त्याला स्थानिकांनी सांगितले की, बहिणीने भावाला मदतीसाठी बोलावण्याचे हे संकेत आहेत.

Sudha Murty, Raksha Bandhan
Assembly Election 2024 : भाजप 2 डझन आमदारांचे तिकीट कापणार; सर्व्हेने वाढवली चिंता

हुमायूनला राणी कर्णावतीला वाचवणे आपले कर्तव्य असल्याची जाणीव झाली आणि तो निघाला. मात्र, त्याला पोहचण्यास विलंब झाला. तो पोहचेपर्यंत तिचा मृत्यू झाला होता, असे मूर्ती यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे. तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली आणि आताही ही पंरपरा देशभरात पाळली जाते. बहीण कितीही अंतरावरून भावाला राखी बांधायला जाऊ शकते, असेही मूर्ती यांनी म्हटले आहे.  

सुधी मूर्ती यांच्या 'एक्स'वरील पोस्टला 1700 लाईक्स आहेत. पण या पोस्टवर तब्बल अडीच हजार प्रतिक्रिया आल्या आहेत. यातील बहुतेक प्रतिक्रिया सुधा मूर्ती यांच्याविरोधातील आहेत. काहींनी कमेंटमध्ये ही गोष्टी खोटी असल्याचा दावा केला आहे. तर काहींनी पौराणिक संदर्भ दिले आहेत. बहुतेकांनी मुर्ती यांना सांगितलेली माहिती चुकीची असल्याचे म्हटले आहे.

Sudha Murty, Raksha Bandhan
Kailash Vijayvargiya : देशात 30 वर्षांनी गृहयुध्द पेटणार! भाजपच्या बड्या नेत्याच्या विधानामुळे वाद...

दरम्यान, भारतीय इतिहासतज्ज्ञ सतिश चंद्र यांच्या पुस्तकामध्ये राणी कर्णावती यांचा संदर्भ आहे. 17 व्या शतकात राजस्थानी पुस्तकात हुमायूनला राणी कर्णावतीकडून राखीच्या स्वरुपात एक ब्रेसलेट पाठवण्यात आले होते, असे या पुस्तकात नमूद करण्यात आल्याचे वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com