Karnataka Result : कर्नाटकच्या शेवटच्या जागेसाठी काटे की टक्कर; काँग्रेस उमेदवार निसटत्या २९४ मतांनी आघाडीवर !

Karnataka Assembly Elections Result 2023 : काही फेऱ्यांची मतमोजणी बाकी, कोण मारणार बाजी?
Karnataka Result :
Karnataka Result : Sarkarnama
Published on
Updated on

Karnataka Assembly Elections Result 2023 : कर्नाटकात काँग्रेसने बहुमतापेक्षाही जास्त जागा मिळवत निर्भेळ यश मिळवले आहे. बऱ्याच मोठ्या कालखंडानतंर या दणदणीत विजयामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसमध्ये चैतन्याचं वातावरण पसरले आहे. कर्नाटक जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी सभा आणि रँली करत जंगजंग पछाडले होते. मात्र इथे भाजपला विजयी करण्यात मोदींचा करिश्मादेखील प्रभाव दाखवू शकला, भाजपला नाकारत कर्नाटकच्या जनतेने काँग्रेसला संधी दिली. 

Karnataka Result :
Karnataka Election Result: कर्नाटकात काँग्रेसचा ऐतिहासिक विजय; राहुल गांधींचं अभिनंदन करत ठाकरे म्हणाले, ही 2024 च्या विजयाची नांदी

कर्नाटकाच्या २२४ जागांपैकी २२३ जागांचे निकाल जाहीर झाले आहे. तर एका जागेचा निकाल अद्याप यायचा आहे. रात्रीचे दहा वाजत आले तरी ही निकाल अद्याप लागलेला नाही. असे असले तरी शेवटच्या विधानसभा जागेसाठी काँग्रेस- भाजपमध्ये काटे की टक्कर होत आहे. कर्नाटकच्या मतदारसंघ क्र. १७३ जयानगर या ठिकाणी भाजप आणि काँग्रेसमध्ये काटे ची लढत अजूनही सुरू आहे. काँग्रेसच्या उमेदवार सौम्या रेड्डी या २९४ मतांनी आघाडीवर आहेत.

Karnataka Result :
Karnataka Election Result: कर्नाटक निवडणुकीत आणखी एक विक्रम; तीन सख्खे भाऊ झाले पुन्हा आमदार

काँग्रेस उमेदवार रेड्डी यांनी ५७५९१ मते पडली आहेत. तर भाजप उमेदवार सी के रामामुर्ती यांना ५७२९७ मते पडली आहेत. भाजप उमेदवार रामामुर्ती २९७ मतांनी पिछाडीवर आहेत. आतारर्यंत १६ फेऱ्यांची मतमोजणी झाली आहे. काही मतमोजणीच्या फेऱया अजूनही बाकी आहेत. ही सर्व माहिती भारतीय निवडणूक आयोगाच्या बेबसाईटवर अधिकृत माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com