Arvind Kejriwal News : केजरीवालांचा पुन्हा बहिष्कारास्त्र; पंतप्रधान मोदींच्या विरोधात आक्रमक मोर्चा..

Arvind Kejriwal On PM Narendra Modi : देशाचं धोरण ठरवणाऱ्या नीती आयोगावर बहिष्कार...
Arvind Kejriwal News
Arvind Kejriwal News Sarkarnama

New Delhi News : आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि केंद्र सरकारमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभावर बहिष्कार टाकण्याची घोषणा करणारे मुख्यमंत्री केजरीवाल आता नीती आयोगाच्या बैठकीवरही बहिष्कार टाकणार आहेत. यासाठी केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.

Arvind Kejriwal News
Narendra Modi Visit To New Parliament Building: पंतप्रधान मोदींची नवीन संसद भवनाला 'सरप्राईज व्हिजिट'! पाहा फोटो...

मुख्यमंत्री केजरीवाल यांनी पंतप्रंधान मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हणतात, 'लोक विचारत आहेत की जर पंतप्रधान सर्वोच्च न्यायालयाचे पालन करत नाहीत, तर लोकांनी न्यायासाठी कुठे जायचं? सहकारी संघराज्य हा विनोदचा भाग बनलेला असताना, नीती आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहण्यात काय अर्थ आहे.

Arvind Kejriwal News
New Parliament see photos : समोर आले नवीन संसद भवनाचे 'खास' फोटो ! जाणून घ्या, नवीन संसद भवनात काय आहे विशेष?

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या पत्रात लिहिले की, 'उद्या नीती आयोगाची बैठक आहे. भारताचे व्हिजन तयार करणे आणि सहकारी संघराज्यवादाला चालना देणे हे आयोगाचे उद्दिष्ट आहे. गेल्या काही वर्षात लोकशाहीवर ज्याप्रकारे हल्ला झाला आहे, बिगर-भाजप सरकार पाडले जात आहेत किंवा त्यांना काम करू दिले जात नाही, ही आपली भारताची दृष्टी नाही. ही सहकारी संघराज्य पद्धती नाही."

Arvind Kejriwal News
New Parliament see photos : समोर आले नवीन संसद भवनाचे 'खास' फोटो ! जाणून घ्या, नवीन संसद भवनात काय आहे विशेष?

"गेल्या काही दिवसांपासून आपसह अनेक विरोधी पक्ष केंद्र सरकारच्या अध्यादेशावर हल्ला चढवत आहेत, ज्या अंतर्गत राजधानी दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या-पोस्टिंगचा अधिकार दिल्ली सरकारकडून काढून घेण्यात आला आहे. अध्यादेशाच्या मुद्द्यावर हल्ला करताना केजरीवाल म्हणाले, 'आठ वर्षांच्या लढ्यानंतर दिल्लीकरांनी सर्वोच्च न्यायालयात लढाई जिंकली, दिल्लीतील जनतेला न्याय मिळाला. अवघ्या आठ दिवसांत तुम्ही अध्यादेश काढून सर्वोच्च न्यायालयाचा आदेश मोडीत काढला," अशी ही टीका त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com