BJP defeats LDF : मोदींचा विजय रथ डाव्यांच्या बालेकिल्ल्यात सुसाट, फडकवला विजयाचा भगवा; विधानसभेपूर्वीच भाजपकडून 40 वर्षांच्या सत्तेला सुरूंग!

BJP Defeats LDF in Thiruvananthapuram Municipal Election, PM Modi Congratulates : केरळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तिरुअनंतपुरम महापालिकेत भाजप ऐतिहासिक विजय मिळवताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केलं आहे.
Kerala local body elections
Kerala local body electionsSarkarnama
Published on
Updated on

Kerala local body elections : केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत, भाजपने चाळीस वर्षांपासून डाव्या लोकशाही आघाडीचा (LDF) बालेकिल्लाला सुरूंग लावला. काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या मतदारसंघातील तिरुअनंतपुरम महापालिकेत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला आहे.

केरळ विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या या कामगिरीने राज्यातील राजकारण हादरलं आहे. काँग्रेस नेते शशी थरूर हे तिरुअनंतपुरम लोकसभा मतदारसंघातून सलग चार वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत, त्यामुळे काँग्रेससाठी हा धक्का मानला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र काँग्रेस कार्यकर्त्याचं अभिनंदन केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी समाज माध्यमांवरील एक्सवर पोस्ट शेअर करत, निवडणुकीत विजय मिळवून दिल्याबद्दल तिरुवनंतपुरमच्या जनतेचे आभार मानले. ते म्हणाले, “केरळमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप आणि एनडीएच्या उमेदवारांना मतदान करणाऱ्या राज्यातील सर्व जनतेचे मी आभार मानतो." केरळ आता यूडीएफ आणि एलडीएफला कंटाळले आहे. राज्यातील लोक आता एनडीएला एकमेव पर्याय म्हणून पाहतात. जो सुशासन प्रदान करू शकतो आणि सर्वांसाठी संधींनी परिपूर्ण विकसित केरळ निर्माण करू शकतो, असे मोदी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी या विजयावर एकच नव्हे, तर आणखी एक पोस्ट शेअर करता, "धन्यवाद तिरुवनंतपुरम! तिरुवनंतपुरम महापालिकेत भाजप-एनडीएला (NDA) मिळालेला जनादेश हा केरळच्या राजकारणातील एक ऐतिहासिक वळण आहे," असे म्हटल आहे. राज्याच्या विकासाच्या आकांक्षा केवळ आमचा पक्षच पूर्ण करू शकतो, यावर लोकांना पूर्ण विश्वास आहे. आमचा पक्ष या चैतन्यशील शहराचा विकास करण्यासाठी आणि लोकांचे राहणीमान सुधारण्यासाठी परिश्रमपूर्वक काम करेल, अशी देखील ग्वाही पंतप्रधान मोदींनी दिली.

Kerala local body elections
India Census 2027 : जनगणनेत माहिती देण्यास नकार देणाऱ्यांना होऊ शकते शिक्षा; काय आहे तरतूद?

यासोबतच पंतप्रधान मोदी म्हणाले, “तिरुवनंतपुरम महापालिकेत शानदार निवडणूक निकाल सुनिश्चित करण्यासाठी जनतेमध्ये काम करणाऱ्या सर्व मेहनती भाजप कार्यकर्त्यांचे मी आभार आणि अभिनंदन करतो. आजचा दिवस म्हणजे केरळमध्ये पिढ्यानपिढ्या तळागाळात काम करणाऱ्या कामगारांच्या कठोर परिश्रम आणि संघर्षाचे स्मरण करण्याचा दिवस आहे. ज्यांच्यामुळे आज हे यश शक्य झाले आहे." आमचे कार्यकर्ते ही आमची ताकद आहेत आणि आम्हाला त्यांचा अभिमान आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.

Kerala local body elections
Gopichand Padalkar On Sharad Pawar Bharat Ratna demand : शरद पवारांना भारतरत्न द्या, खासदार लंकेंची मागणी; पडळकर म्हणाले, 'काय मंडळाचा..!'

केरळची राजधानी तिरुअनंतपुरम इथल्या महापालिका निवडणुकीत भाजप आणि एनडीए उमेदवारांचा विजय डाव्या (LDF) पक्षांसाठी एक मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. कारण डावे पक्ष इथं चार दशकांहून अधिक काळ सत्तेत आहेत. याशिवाय, काँग्रेस नेते शशी थरूर हे तिरुअनंतपुरम लोकसभा मतदारसंघातून सलग चार वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत, त्यामुळे काँग्रेससाठी भाजपचा विजय हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com