IAS Officer Suspend : हिंदू अधिकारी, मुस्लिम अधिकारी..! WhatsApp वर ग्रुप करणारे IAS अधिकारी निलंबित

Kerala Government K Golakrishnan : केरळचे मुख्यमंत्री विजयन यांनी हा प्रकार समोर आल्यानंतर आयएएस अधिकाऱ्याला निलंबन करण्याचा निर्णय घेतला.
IAS K Gopalkrishnan
IAS K GopalkrishnanSarkarnama
Published on
Updated on

Kerala News : IAS अधिकाऱ्याकडून राज्यातील अधिकाऱ्यांचे मोबाईलवर धर्माच्या आधारे वॉट्सअप ग्रुप बनवल्याचे प्रकरण चांगलेच तापले आहे. या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापू लागल्यानंतर मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी संबंधित अधिकाऱ्याला सोमवारी सेवेतून निलंबित केल्याचे समोर आले आहे.

आयएएस के. गोपालकृष्णन यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. गोलालकृष्णन यांनी सरकारी अधिकाऱ्यांचे हिंदू अधिकारी, मुस्लिम अधिकारी असे ग्रुप तयार केले होते. राज्याच्या मुख्य सचिवांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते.

IAS K Gopalkrishnan
Jharkhand Assembly Election: ‘कोल्हान टायगर’ विरोधकांना जड जाणार अन् भाजपला तारणार? 43 मतदारसंघात लागणार कस

गोपालकृष्णन हे उद्योग आणि वाणिज्य विभागाचे संचालक होते. त्यांच्याविरोधात तिरुवनंतपुरम सिटी पोलिसांनीही चौकशी केली होती. याबाबतचा अहवालही पोलिस महासंचालकांकडे सादर करण्यात आला आहे. ‘Mallu Hindu Officers' आणि 'Mallu Muslim Officers' अशी ग्रुपला नावे देण्यात आली होती. त्यामध्ये इतर आयएएस अधिकाऱ्यांनाही घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

फोन हॅक झाला

गोपालकृष्णन यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपला फोन हॅक झाल्याची तक्रार त्यांनी पोलिसांत दिली होती. मोबाईल हॅक करून धर्मावर आधारित वॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आले होते, असा दावा गोपालकृष्णन यांनी केला होता. पोलिसांनी मात्र हा दावा खोडून काढला आहे. मोबाईल हॅक झाल्याबाबतची काही माहिती समोर आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

IAS K Gopalkrishnan
Rahul Gandhi VIDEO: चिखलीतील सभा रद्द होऊनही राहुल गांधींनी मुद्द्यालाच हात घातला! म्हणाले...

शासकीय नियमांचे उल्लंघन

अधिकाऱ्यांकडून पदानुसार वरिष्ठ, कनिष्ठ अधिकारी असे ग्रुप करू शकतात. मात्र, हिंदू, मुस्लिम अधिकाऱ्यांचे स्वतंत्र ग्रुप बनवले जाऊ शकत नाही. हे धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात आहे. त्यामुळे शासकीय नियमांचे उल्लंघन होत असल्याचे कारण देत सरकारने गोपालकृष्णन यांचे निलंबन केले आहे. ग्रुप बनविल्याचे समोर आल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ग्रुप डिलिट करण्यात आले.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com