

Mumbai News: मुंबई महापालिकेत भाजप आणि शिवसेनेच्या युतीनं तब्बल 118 जागा मिळवून एकहाती सत्ता काबीज केली. या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची 25 वर्षांची सत्ता उलथवण्यात भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला यश आलं. या निकालानंतर सर्वांचं लक्ष हे 17 प्रभाग समित्यांच्या (24 वॉर्ड मिळून) अध्यक्षपदावर कोणाचा दबदबा राहणार याकडे लागलेलं होतं. पण सोमवारी पार पडलेल्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी केलेल्या एका चुकीमुळे पक्षाला मोठा फटका बसला अन् सत्ताही गमवावी लागली.
मुंबई महापालिकेच्या प्रभाग समितीच्या निवडणुकीत बिनविरोध अध्यक्ष निवडले गेले, तर 'एस' आणि 'टी' ची निवडणूक प्रचंड चर्चेचा विषय ठरली. या ठिकाणी भाजपच्या समसमान नगरसेवकांचं संख्याबळ हाती असतानाही एस आणि टी प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पराभवाला सामोरे जावे लागले.10 - 10 सदस्य संख्या असल्यानं या प्रभागात निवडणूक पार पडली. पण याच निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन मतं अवैध ठरल्यानं भाजप उमेदवाराच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला.
बीएमसीच्या सोमवारी(ता.09)पार पडलेल्या अखेरच्या पाच प्रभाग समिती अध्यक्षपदांच्या निवडणुकीत तीन प्रभाग समितींचं अध्यक्षपद भाजपनं खेचून आणलं. आता महापालिकेच्या एकूण 17 पैकी 11 प्रभाग समित्यांवर भाजप आणि शिवसेनेनं जिंकत आपला वर्चस्व कायम राखलं. उर्वरित सहा समित्यांच्या अध्यक्षांमध्ये, काँग्रेसचे दोन,उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 1, मनसे 1 आणि एमआयएमचे 1 उमेदवार निवडून आले आहेत.
मुंबई महापालिकेच्या प्रभाग समितीच्या 'एस' आणि 'टी' ची निवडणुकीत महायुती आणि उद्धव ठाकरेंच्या पुरस्कृत मित्रपक्षांकडे प्रत्येकी 10-10 असे तुल्यबळ संख्याबळ होते. मात्र, मतदानाच्या वेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक सुरेश शिंदे आणि नगरसेविका दीपमाला बढे यांनी चक्क भाजप उमेदवार साक्षी दळवी यांच्या कॉलममध्ये सही केल्याचं आढळून आलं.
मुंबई महापालिकेतील दोन अनुभवी नगरसेवकांनी केलेल्या या एका चुकीचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा फटका सहन करावा लागला. ठाकरेंच्या शिवसेनेची दोन मतं अवैध ठरल्यानं पक्षाच्या हातातून अध्यक्षपद निसटलं. कारण समसमान मतं मिळाली असती, तर ईश्वरी चिठ्ठीद्वारे अध्यक्षपद पदरात पडण्याची शक्यता होती. पण ठाकरेंच्या अनुभवी नगरसेवकांनी केलेल्या चुकीवर महापालिकेच्या वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली.
मुंबई महापालिकेl एकूण 17 प्रभाग समित्या असून त्यांच्या अध्यक्षपदांसाठी 5, 6 आणि 9 मार्च रोजी निवडणुका पार पडल्या. यावेळी महापौर रितू तावडे यांनी एल व एन या दोन प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. तर एम पूर्व, एम पश्चिम तसेच एस आणि टी या तीन प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उपमहापौर संजय घाडी यांनी पीठासीन अधिकारी काम पाहिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.