
New Delhi News : लंडनच्या दौऱ्यावर असलेले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यावर खलिस्तान्यांकडून हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. खलिस्तानी समर्थकांनी त्यांच्या गाडीसमोर येत तिरंगा ध्वज फाडला. विशेष म्हणजे यावेळी घटनेच्याठिकाणी पोलिसांचा बंदोबस्तही होता. लंडमधील एका कार्यक्रमातून परतत असताना ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.
लंडनमध्ये जयशंकर यांच्याकडून विविध बैठका घेतल्या जात आहेत. गुरुवारी चॅथम हाऊस येथे एका कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. या कार्यक्रमातून बाहेर पडल्यानंतर ते गाडीत बसले. यावेळी कार्य़क्रमाच्या ठिकाणी खलिस्थानी समर्थकांकडून हातात झेंडे घेत जोरदार घोषणाबाजी केली जात होती. त्यामुळे पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.
जयशंकर गाडीत बसल्यानंतर हातात भारताचा राष्ट्रध्वज घेतलेली एक व्यक्ती अचानक घोषणा देत समोर आला आणि गाडीला अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी तातडीने या व्यक्तीला ताब्यात घेत बाजूला सारले. यादरम्यान त्याने राष्ट्रध्वज फाडला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
दरम्यान, या घटनेनंतर भारतीयांकडूनही संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रध्वजाचा अपमान करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी लंडनमधील भारतीयांकडून केली जात आहे. खलिस्तानी समर्थकांकडून यापूर्वीही भारतीय दुतावासांसह मंदिरांवर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. केंद्र सरकारने त्यावरून संतापही व्यक्त केला आहे.
आता थेट जयशंकर यांनाच लक्ष्य केल्याने ही मोठी घटना मानली जात आहे. अशा घटनेला जयशंकर यांना पहिल्यांदाच सामोरे जावे लागल्याचे मानले जात आहे. खलिस्तान्यांकडून कॅनडासह इतर देशांमध्येही भारताविरोधात आक्रमक पवित्रा घेतला जात आहे. प्रामुख्याने कॅनडामध्ये याची तीव्रता मोठी आहे. खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नू हा सातत्याने भारताविरोधात गरळ ओकत असतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.