Kapil Sibal News : कोलकाता प्रकरण सुनावणीवेळी सरन्यायाधीशांसमोरच सिब्बलांना फटकारलं; म्हणाले,'आपण निदान हसू तरी नका...'

Kolkata Doctor Murder Case Hearing In Supreme Court : कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये 9 ऑगस्ट रोजी झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी देशभरात खळबळ उडाली आहे.सध्या या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे.
Kapil Sibal  - d.y. Chandrachud.jpg
Kapil Sibal - d.y. Chandrachud.jpgSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : कोलकाताच्या आरजी कार मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा बलात्कार करुन हत्या केल्याची घटना उघडकीस आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरुन कोलकातामध्ये ममता बॅनर्जी यांच्या सरकारविरोधात भाजप आणि डाव्या पक्षांनी रान उठवलं आहे.

या प्रकरणातील दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जोरदारपणे केली जात आहे. याप्रकरणी पश्चिम बंगालची बाजू मांडणाऱ्या सरकारी वकील कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांना सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांसमोरच सीबीआयचे सॉलिसिटर तुषार मेहता यांनी चांगलंच फटकारलं आहे.

सर्वोच्च न्यायालयात कोलकाता आरजी मेडिकल कॉलेज हॉस्पिटल प्रशिक्षणार्थी डॉक्टर बलात्कार व हत्या प्रकरणात गुरुवारी (ता.22) सुनावणी झाली. यावेळी सीबीआयचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आणि पश्चिम बंगाल सरकारचे वकील कपिल सिब्बल यांच्यात खडाजंगी झाली. या सुनावणीवेळी हसून उत्तर देणाऱ्या सिब्बल यांची सॉलिसिटर तुषार मेहता सरन्यायाधीशांसमोरच कानउघडणी केली.

न्यायालयात नेमकं काय घडलं..?

सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सीबीआयच्या वतीने उपस्थित असलेले तुषार मेहता कोलकाता प्रकरणातील डीडी एंट्रीबाबत आपली भूमिका मांडत होते. यावेळी पश्चिम बंगाल सरकारची बाजू मांडणारे वकील कपिल सिब्बल यांनी मेहतांच्या प्रश्नाला हसून उत्तर दिले. यावर मेहता यांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी सिब्बल यांच्या हसण्यावर आक्षेप घेत त्यांना खडेबोल सुनावले.

मेहता म्हणाले,कोलकाता येथील महिला डॉक्टर मरण पावली आहे. त्या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. तुम्ही कसे हसू शकता? या घटनेची सुनावणी सुरू असताना आपण निदान हसू तरी नका. हा कुणाच्या तरी प्रतिष्ठेचा प्रश्न आहे अशा शब्दांत मेहता यांनी सिब्बल यांची कानउघडणी केली.

Kapil Sibal  - d.y. Chandrachud.jpg
MPSC News: दुर्दैव! कुटुंब मागे सोडलेल्या विद्यार्थ्यांनी स्वप्नांचा पाठलाग करावा की निगरगट्ट व्यवस्थेशी भिडावं?

कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये 9 ऑगस्ट रोजी झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी देशभरात खळबळ उडाली आहे.सध्या या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. तर देशाच्या विविध भागात डॉक्टरांकडून या घटनेविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येत आहे.

सर्वोच्च न्यायालयात कोलकाता डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरणाची सुनावणी झाली. ही सुनावणी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड,न्यायमूर्ती जे.बी. परडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर पार पडली.या सुनावणीवेळी कोलकाता पोलिसांसह सीबीआयनेही त्यांचा स्टेटस रिपोर्ट सादर केला.

Kapil Sibal  - d.y. Chandrachud.jpg
Video Badlapur Rape Case : मोठी बातमी! बदलापूर प्रकरणानंतर सरकार 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये, गृह सचिवपदी 'हा' बडा अधिकारी

या सुनावणीवेळी कपिल सिब्बल आणि तुषार मेहता यांच्यात शाब्दिक चकमकी उडाल्याचं दिसून आले. आधी मेहता यांनी आमच्या नेत्याविरोधात काही बोलले तर बोटे छाटली जातील, या पश्चिम बंगालच्या विद्यमान मंत्र्यांच्या विधानाचा संदर्भ देत सिब्बल यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.

यावर सिब्बल यांनी देखील जोरदार पलटवार करताना'तुमचे नेते म्हणतात की गोळी घालू असं मेहता यांच्या लक्षात आणून दिले.यावेळी सरन्यायाधिशांनी मध्यस्थी करत दोन्ही वकिलांना शांत केले. नंतर मग या प्रकरणाचे राजकारण करू नका, आम्हाला डॉक्टरांचे कल्याण आणि सुरक्षिततेची काळजी असल्याचं न्यायाधिशांनी सिब्बल आणि मेहता यांना सांगितलं.

Kapil Sibal  - d.y. Chandrachud.jpg
Shyam Rajak News : 'मैं शतरंज का शौकीन नहीं था, इसलिए...' ; लालूंवर आरोप करत श्याम रजक यांचा 'RJD'ला झटका!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com