Video Badlapur Rape Case : मोठी बातमी! बदलापूर प्रकरणानंतर सरकार 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये, गृह सचिवपदी 'हा' बडा अधिकारी

Badlapur Rape Case Iqbal Chahal : बदलापूरमधील घटनेची हायकोर्टात सुनावणी होत आहे. या पार्श्वभूमीवरती इक्बाल चहल यांची गृह खात्याचे अवर मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Iqbal Chahal
Iqbal Chahal sarkarnama
Published on
Updated on

Iqbal Chahal News : बदलापूरमध्ये लहान मुलींच्या लैंगिक शोषणाचा प्रकाराची गंभीर दखल मुंबई हायकोर्टाने घेतली आहे. आज (गुरुवारी) या प्रकरणावरून पोलिस आणि राज्य सरकारला हायकोर्टाने खडेबोल सुनावले. त्यामुळे राज्य सरकार खडबडून जागे झाले आहे.

हायकोर्टाच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवरती इक्बाल चहल यांची गृह खात्याच्या अवर मुख्य सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच चहल यांनी तत्काळ कार्यभार स्वीकारावा, असा आदेश देखील राज्य सरकारकडून देण्यात आला आहे.

बदलापूरमध्ये मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीस आल्यानंतर हायकोर्टाने सुमोटो दाखल करत या प्रकरणाची आज सुनावनी घेतली. पोलिस, शाळा प्रशासना आणि राज्य सरकारने केलेल्या चुकांवर कोर्टाने बोट ठेवतं नागरिक रस्त्यावर उतरवल्यावर एसआयटी नेमणार का?, असे खडे बोल सुनावले.

Iqbal Chahal
Thackeray Group: चार भिंतीच्या आड तरी CM पदाचा चेहरा ठरवा; ठाकरे गटाचा आग्रह

लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यात कायदा सुव्यवस्था नसल्याची टीका विरोधकांनी केली आहे. तर, बदलापूरमध्ये झालेल्या आंदोलनामागे विरोध असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. तर, मुख्यमंत्र्यांना यामागे राजकारण दिसत असेल तर ते विकृत मानसिकतेचे आहेत, असा पलटवार उद्धव ठाकरे यांनी केला होता.

पोलिसांवर कारवाईची मागणी

न्यायालयाने सुनावणी दरम्यान पोलिसांना त्यांच्या 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' या ब्रीदवाक्याची आठवण करुन दिली. तर, पोलिस दबावाखाली काम करत असतील तर त्यांच्यावर दबाव आणणाऱ्या आणि दबावात काम करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करायला हवी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

Iqbal Chahal
Badalapur Case : बदलापूर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचे सरकार आणि पोलिसांवर ताशेरे, सुनावणीत नेमकं काय घडलं?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com