School Teacher Recruitment : कोर्टाकडून शिक्षक भरती रद्द; प्रचाराच्या धडाक्यात ममतांना मोठा धक्का

Mamata Banerjee News : शिक्षक भरतीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. भरतीसाठी 5 ते 15 लाख रुपये लाच घेतल्याचाही आरोप आहे.
CM Mamata Banerjee
CM Mamata BanerjeeSarkarnama

West Bengal News : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका सुरू असताना कलकत्ता हायकोर्टाने ममता सरकारला मोठा धक्का दिला आहे. हायकोर्टाने पश्चिम बंगाल स्कूल सेवा आयोगामार्फत करण्यात आलेल्या शिक्षक भरती (School Teacher Recruitment) रद्द केली आहे. कोर्टाने 2016 चा संपूर्ण जॉब पॅनेल रद्द केल्याने जवळपास 24 हजार नोकऱ्यांवर गंडांतर आले आहे. या भरती प्रक्रियेत 5 ते 15 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे.

बंगालमधील शिक्षक भरती घोटाळाप्रकरणी माजी शिक्षणमंत्री पार्थ चटर्जी आणि तृणमूलच्या (TMC) काही पदाधिकाऱ्यांसह राज्याच्या शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांनाही यापूर्वीच अटक करण्यात आली होती. हायकोर्टाच्या आदेशानंतर ईडी (ED) आणि सीबीआयकडून (CBI) या प्रकरणाचा तपास केला जात आहे.

CM Mamata Banerjee
LokSabha Election News : मुस्लिमांबाबत मनमोहन सिंग यांचं ‘ते’ विधान, 18 वर्षांनंतर मोदींनी केला निवडणुकीचा मुद्दा

काय आहे घोटाळा?

कथित शिक्षक भरती घोटाळा 2014 मधील आहे. तेव्हा पश्चिम बंगाल स्कूल सेवा आयोगाने बंगालमधील सरकारी शाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी जाहिरात काढली होती. मात्र, त्यानंतर दोन वर्षांनी ही प्रक्रिया सुरू झाली होती. त्यावेळी पार्थ चॅटर्जी शिक्षण मंत्री होते. या प्रक्रियेदरम्यान घोटाळा झाल्याच्या अनेक तक्रारी हायकोर्टात दाखल करण्यात आल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हायकोर्टात दाखल याचिकेमध्ये आरोप करण्यात आला आहे की, भरती परीक्षेत कमी गुण मिळालेल्या उमेदवारांची निवड करण्यात आली. मेरिट लिस्टमध्ये नाव नसलेल्यांचीही निवड झाली. परीक्षेत उत्तीर्ण न झालेल्या उमेदवारांनाही नोकरी मिळाली. या सर्व याचिकांचा विचार करून हायकोर्टाने सीबीआय चौकशीला परवानगी दिली होती. त्यानंतर ईडीनेही या तपासात उडी घेतली.

तपास यंत्रणांकडून या प्रकरणात तृणमूलच्या नेत्यांसह पदाधिकारी, शासकीय अधिकारी, इतर काही लोकांनाही अटक केली होती. कोट्यवधी रुपये जप्तही करण्यात आले आहेत. यावरून भाजपनेही (BJP) ममता सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. आता हायकोर्टाने ही भरती रद्द करण्याचा निर्णय़ घेतल्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी धक्का बसला आहे.

लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असतानाच भरती रद्द झाल्याने भाजपच्या हाती आयते कोलित मिळाले आहे. हा मुद्दा प्रचारादरम्यान गाजणार असल्याचे स्पष्ट आहे. ममता बॅनर्जी यांनीही यापूर्वी भाजपमुळेच ही भरती प्रक्रिया थांबल्याचा आरोप केला होता. आताही त्यावरून ममतांकडून भाजपवर निशाणा साधला जाऊ शकतो.

R

CM Mamata Banerjee
Sunita Kejriwal News : सुनीता केजरीवालांचा भाजप सरकारवर गंभीर आरोप; म्हणाल्या, "तुरुंगात मुख्यमंत्र्यांना..."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com