LokSabha Election News : मुस्लिमांबाबत मनमोहन सिंग यांचं ‘ते’ विधान, 18 वर्षांनंतर मोदींनी केला निवडणुकीचा मुद्दा

Manmohan Singh : मनमोहन सिंग यांनी अल्पसंख्याकाची विकासामध्ये समान भागीदारीसाठी निश्चित करण्यासाठी त्यांच्या सशक्तीकरणाबाबत वक्तव्य केलं होतं.
PM Narendra Modi, Manmohan Singh
PM Narendra Modi, Manmohan SinghSarkarnama

New Delhi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी (LokSabha Election News) यांनी रविवारी राजस्थानमधील एका प्रचार सभेत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे 18 वर्षांपूर्वीचे एक विधान आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका केली. काँग्रेसची सत्ता आल्यास लोकांची संपत्ती जास्त मुले असलेल्यांना आणि घुसखोरांना वाटली जाईल, असे मोदी म्हणाले आहेत. त्यावरून आता वाद निर्माण झाला आहे. काँग्रेससह एमआयएमने मोदींवर टीका करत त्यांच्याकडे आता निवडणुकीत दुसरे मुद्देच नसल्याचे सांगत निशाणा साधला आहे.

मोदींनी (PM Narendra Modi) प्रचार सभेत टीका करताना मनमोहन सिंग यांच्या 2006 मधील एका विधानाचा संदर्भ दिला. ते म्हणाले, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांनी म्हटले होते की, देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे. काँग्रेस (Congress) सत्तेत आली तर माता-भगिनींचं सोनं घुसखोरांना वाटेल. काँग्रेसची शहरी नक्षली मानसिकता माझ्या माता-भगिनींचे मंगळसूत्र सोडणार नाही.

PM Narendra Modi, Manmohan Singh
Congress News : काँग्रेसला 'अच्छे दिन', भाजपच्याही पुढे

काँग्रेसच्या घोषणापत्रामध्ये म्हटले आहे की, ते माता-भगिनींच्या सोन्याचा हिशेब करती, त्याची माहिती घेतील आणि ती संपत्ती अल्पसंख्याकामध्ये वाटतील. काँग्रेस सत्तेत असताना त्यांनी म्हटले होते की, देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे. याचा अर्थ सर्व संपत्ती एकत्र करून कुणाला वाटणार? ज्यांची जास्त मुले आहेत, त्यांना संपत्ती वाटणार. ही संपत्ती घुसखोरांना वाटतील, असे मोदी म्हणाले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काय म्हणाले होते मनमोहन सिंग?

मनमोहन सिंग यांनी 2006 मध्ये राष्ट्रीय विकास परिषदेच्या बैठकीत बोलताना म्हटले होते की, आमची सामूहिक प्राथमिकता स्पष्ट आहे. कृषी, सिंचन आणि जल संधारण, आरोग्य, शिक्षण, ग्रामीण पायाभूत सुविधामधील गुंतवणूक, अनुसूचित जाती आणि जमाती तसेच इतर मागासवर्ग, अल्पसंख्याक, महिला व मुले यांच्या सशक्तीकरणासाठीचे कार्यक्रम आमची प्राथमिकता आहे. अनुसूचित जाती आणि जमातींच्या योजनांना नव्या पद्धतीने तयार करण्याची गरज आहे. अल्पसंख्याक, विशेषत: मुस्लिमांना विकासात समान भागीदारी मिळायला हवी. स्त्रोतांवर पहिला अधिकार त्यांचा असायला हवा.

माजी पंतप्रधानांच्या या विधानावर त्यावेळीही वाद निर्माण झाला होता. पंतप्रधान कार्यालयाकडून त्यावेळी स्पष्टीकरणही देण्यात आले होते. पंतप्रधानांनी अल्पसंख्याकांच्या सशक्तीकरणाबाबत भाष्य केले होते. त्याला चुकीच्या संदर्भाने मांडण्यात आले आहे, असे स्पष्ट करण्यात आले होते. पंतप्रधान मोदींना आता याच विधानावर काँग्रेसवर टीका केली आहे.

काँग्रेसकडून पलटवार

काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधानांच्या कालच्या विधानावरून पलटवार केला आहे. त्यांनी एक्सवर म्हटले आहे की, पहिल्या टप्प्यातील मतदानामध्ये निराशा हाती लागल्यानंतर नरेंद्र मोदी यांचा खोटे बोलण्याचा स्तर खूप घसरला आहे. आता ते मुद्द्यांपासून जनतेला भटकवत आहेत. काँग्रेसच्या क्रांतिकारी जाहीरनाम्याला मिळत असलेल्या समर्थनाचे निकाल येण्यास आता सुरुवात झाली आहे. देश आता आपल्या मुद्द्यांवरच मतदान करेल. रोजगार, आपले कुटुंब आणि आपल्या भविष्यासाठी मतदान करेल. भारत भटकणार नाही, असे राहुल यांनी म्हटले आहे.

R

PM Narendra Modi, Manmohan Singh
India Alliance News : इंडिया आघाडीच्या सभेत राडा; खुर्च्या, लाठ्यांनी एकमेकांवर प्रहार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com