Kolkata Rape Murder Case : केवळ कोलकाताच नव्हे तर संपूर्ण देशात..! सरन्यायाधीश चंद्रचूड संतापले

Supreme Court CJI Dhananjay Chandrachud Doctors Protest : कोलकाता बलात्कार, खून प्रकरणावर मंगळवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली.
CJI Dhananjay Chandrachud
CJI Dhananjay ChandrachudSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : कोलकाता बलात्कार व खून प्रकरणावरून सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. सुप्रीम कोर्टात मंगळवारी या प्रकरणावर झालेल्या सुनावणीवेळी त्यांनी पश्चिम बंगाल सरकारला धारेवर धरताना देशभरातील महिला व युवा डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली.

कोलकाता येथील आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयातील ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून खून केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली आहे. त्यावरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे. सुप्रीम कोर्टानेही या घटनेची दखल घेतली असून मंगळवारी त्यावर सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने देशभरातील डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

CJI Dhananjay Chandrachud
Shashi Tharoor : शशी थरूर यांनीच राहुल गांधींना पाडलं तोंडावर’; सरकारच्या निर्णयाला उघड पाठिंबा

काय म्हणाले सरन्यायाधीश?

केवळ कोलकाता येथील हत्येचे प्रकरण नव्हे तर देशभरातील डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा आहे. ड़ॉक्टरांनी आंदोलन थांबवावे, त्यांची सुरक्षेसाठी आम्ही आहोत. हा राष्ट्रहिताचा मुद्दा असून आमच्यावर विश्वास ठेवा, असे आवाहन सरन्यायाधीश चंदचूड यांनी डॉक्टरांना केले.

महिला व युवा डॉक्टरांच्या सुरक्षेविषयी आम्हाला चिंता आहे. रुग्णालयांमध्ये ड्यूटी रूम नसते, असे निदर्शनास आले आहे. त्यांच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण तयार करण्यासाठी एक प्रोटोकॉल हवा. सर्व इंटर्न, निवासी डॉक्टर आणि प्रामुख्याने महिला डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. हा प्रोटोकॉल केवळ कागदावर राहू नये, असेही सरन्यायाधीश म्हणाले.

बंगाल सरकार, प्रशासनावर भडकले

सरन्यायाधीशांनी सुनावणीदरम्यान बंगाल सरकार आणि रुग्णालय प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. अनेक प्रश्नांचा भडिमार कोर्टाने केला. प्राचार्य संदीप घोष काय करत होते, वेळेत गुन्हा दाखल का झाला नाही, आई-वडिलांना पीडितेचा मृतदेह उशिरा का दिला, पोलिस काय करत होते, गंभीर गुन्हा असताना आंदोलनकर्त्यांना रुग्णालयात कसे घुसू दिले, असे अनेक प्रश्न करत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी बंगाल पोलिसांच्या सुरूवातीच्या तपासावर साशंकता व्यक्त केली.

CJI Dhananjay Chandrachud
Assembly Election 2024 : उमर अब्दुल्लांपाठोपाठ मेहबूबा मुफ्तीही शपथेला जागणार; मुलीला उतरवलं रिंगणात

सीबीआयकडे मागितला रिपोर्ट

कोलकाता हायकोर्टाने बलात्कार व खूप प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने सीबीआयकडे स्टेटस रिपोर्टची देण्याची सूचना केली आहे. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचीही करडी नजर राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com