Kripashankar Singh News : भाजपच्या कृपेने आता कृपाशंकर सिंहांना उत्तर प्रदेशातून दिल्ली गाठावी लागणार!

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने 16 राज्यांमधून 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.
Kripashankar Singh
Kripashankar Singh Sarkarnama
Published on
Updated on

BJPs first list For Loksabha Election :  भारतीय जनता पार्टीने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 16 राज्यांमधून 195 उमेदवारांची पहिली यादी शनिवारी जाहीर केली. या यादीमध्ये पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला या दिग्गजांसह 34 केंद्रीय मंत्री, दोन माजी मुख्यमंत्री, महिला, तरुणांसह समाजातील जवळपास सर्व समाज घटकांमधील उमेदवारांचा समावेश केल्याचे दिसून आले आहे.

भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्राला स्थान नसले तरी महाराष्ट्राशी निगडित असणाऱ्या कृपाशंकर सिंह यांच्यावर भाजपने(BJP) कृपा केली आहे. उत्तर प्रदेशमधील जौनपूर मतदारसंघामधून कृपाशंकर सिंह यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Kripashankar Singh
Loksabha Election 2024 : पंतप्रधान मोदी वाराणसीमधून निवडणूक लढवणार; भाजपची 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

कृपाशंकर सिंह हे मुंबईतील भाजपचे प्रमुख नेते असून, त्यांच्याकडे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष पदही आहे. 2019मध्ये त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपत प्रवेश केला. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर भारतीय मतदार डोळ्यांसमोर भाजपने कृपाशंकर सिंह यांची 2022मध्ये महाराष्ट्र भाजपच्या उत्तर भारतीय मोर्चा प्रभारी पदी नियुक्तीही केली होती. शिवाय, कृपाशंकर सिंह (Krupashankar singh) यांनी 2022मध्ये उत्तर प्रदेश सरकारला मराठीला पर्यायी भाषेचा दर्जा देण्याचे आवाहन केले होते. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून ही मागणी केली होती.

तर भाजपमध्ये येण्याअगोदर कृपाशंकर सिंह मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते. मुंबईतील उत्तर भारतीयांचा प्रमुख चेहरा म्हणून कृपाशंकर सिंह यांची एक वेगळी ओळख आहे. शिवाय 2004च्या आघाडी सरकारच्या काळात ते गृहराज्यमंत्रीही होते.

कृपाशंकर सिंह हे 1971मध्ये उत्तर प्रदेशच्या जौनपूरमधूनच मुंबईत रोजगाराच्या शोधात आले होते. त्यांचे वडील स्वातंत्र्य सैनिक होते, तर कृपाशंकर सिंह यांनी मुंबईत आल्यानंतर सुरुवातीला नोकरी, छोटा-मोठा व्यवसायसुद्धा केला. झोपडपट्टीत राहत असताना तेथील नागरिकांच्या समस्यांसाठी आवाज उठवला आणि सामाजिक कामांमध्ये सहभाग घेणे सुरू केले. कालांतराने त्यांची माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी भेट झाली आणि ते राजकारणात आले.

Kripashankar Singh
BJP Lok Sabha Candidate First List : 'मिशन 45'चा दावा, पण भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्राला स्थानच नाही

उत्तर प्रदेशातील 51, पश्चिम बंगालमधील 20, मध्य प्रदेशातील 24, गुजरात आणि राजस्थानमधील प्रत्येकी 15, केरळमधील 12, तेलंगणातील 9, आसाममधील 11, झारखंड आणि छत्तीसगडमधील प्रत्येकी 11 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. दिल्लीतून 5, जम्मू-काश्मीरमधून 2, उत्तराखंडमधून 3, अरुणाचल प्रदेशमधून 2 आणि गोवा, त्रिपुरा, अंदमान आणि निकोबार आणि दमण तसेच दीवमधून प्रत्येकी 1 एक उमेदवारांचा भाजपच्या पहिल्या यादीत समावेश आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com