Lady Don Zoya Khan : पोलिसांना गुंगारा देणारी ‘लेडी डॉन’ अखेर गजाआड; हायफाय लाईफस्टाईल पण चालवायची गँग...

Delhi Police Hasim Baba Gang Crime News : दिल्ली पोलिसांनी लेडी डॉन झोया खानला 270 ग्रॅम हेरॉईन या ड्रग्जसह पकडले आहे.
Zoya Khan
Zoya KhanSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : दिल्लीतील कुख्यात गॅंगस्टर हाशिम बाबाची पत्नी आणि लेडी डॉन म्हणून ओळखली जाणारी झोया खान अखेर पोलिसांच्या कचाट्यात सापडली. पोलिसांच्या विशेष पथकाने तिला 270 ग्रॅम हेरॉइन ड्रग्जसह पकडले आहे. मागील अनेक दिवसांपासून पोलिस तिला पकडण्यासाठी पुरावे गोळा करत होते. पण ती प्रत्येकवेळी पोलिसांना गुंगारा द्यायची. हाशिम बाबाची संपूर्ण टोळी तीच सांभाळत होती.

झोया खान ही हाशिम बाबाची तिसरी पत्नी आहे. तपास यंत्रणांना चकमा देण्यात ती तरबेज होती. हाशिम बाबा तुरुंगात गेल्यानंतर तीच गँग चालवायची, असा पोलिसांना संशय होता. पण तिच्याविरोधात कोणताही पुरावा पोलिसांच्या हाती लागत नव्हता. त्यामुळे पोलिसांना तिला अटक करणे शक्य होत नव्हते. हाशिम बाबावर खून, खंडणी, तस्करी याचे डझनभर गुन्हे दाखल आहेत. 'एनडीटीव्ही'ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Zoya Khan
Rahul Gandhi News : भाजपच्या डबल इंजिन सरकारनंतर आता राहुल गांधींची डबल इंजिन ‘खासदार’ स्ट्रॅटेजी

हाशिम बाबा आणि झोया खान यांचे प्रेमसंबंध होते. त्यातून त्यांचा 2017 मध्ये विवाह झाला. तेव्हापासून हाशिम बाबाच्या गँगसोबत झोया जोडली गेली होती. बाबाला पोलिसांनी अटक केल्यानंतर झोयाच खंडणी आणि ड्रग्जचा पुरवठ्याचे काम पाहायची. पण तिची लाईफस्टाईल भल्याभल्यांना भुरळ पाडणारी होती. हायप्रोफाईल पार्टीमध्ये उपस्थिती, महागडे कपडे, दागिने, गाड्या असे तिचे राहणीमान होते.

पत्नी हाशिम बाबाला भेटण्यासाठी झोया तिहार जेलमध्येही जायची. बाबाने तिला गुन्हेगारी क्षेत्रातील अनेक क्लुप्त्या सांगत चांगलेच ट्रेन केले होते. पत्नीचे सहकारी आणि इतर गुन्हेगारांच्याही ती संपर्कात होती, असे दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिस तिला अटक करण्यासाठी अनेक वर्षे प्रयत्न करत होते. यावेळी पोलिसांनी यश मिळाले.

Zoya Khan
Sanjay Raut And Sharad Pawar : "असे लोक संकुचित नसतात..." बाळासाहेबांचं नाव घेत पवारांकडून राऊतांचे कौतुक

खबऱ्यांमार्फत पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी बुधवारी रात्री झोया खानला अटक केली. तिच्याजवळ सुमारे एक कोटी रुपये किंमतीचे ड्रग्ज होते. त्यामुळे तिच्याविरोधात पोलिसांना सबळ पुरावाही मिळाला आहे. झोयाचे आई-वडीलही गुन्हेगारी क्षेत्रात होते. तिच्या आईला मागील वर्षीच सेक्स ट्रॅफिकिंग प्रकरणात अटक केली होती. तर वडिलांचाही ड्रग्ज पुरवठ्याशी संबंध होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com