Rahul Gandhi News : भाजपच्या डबल इंजिन सरकारनंतर आता राहुल गांधींची डबल इंजिन ‘खासदार’ स्ट्रॅटेजी

Raebareli Constituency MP Priyanka Gandhi News : रायबरेली येथे एका कार्य़क्रमात बोलताना राहुल गांधी यांनी रायबरेलीला दोन खासदार असल्याचे विधान केले आहे.
MP Rahul Gandhi
MP Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Congress Politics : कोणत्याही राज्यात विधानसभेची निवडणूक असो, भाजपकडून डबल इंजिन सरकारचा नारा दिला जातो. राज्यां-राज्यांतील नेते केंद्रातील मोदी सरकारचा हवाला देत राज्यातही भाजपला विजयी करण्याचे आवाहन मतदारांना करतात. भाजपची डबल इंजिनची ही स्ट्रटेजी इतर पक्षांनाही भावली आहे. त्यामध्ये आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांचीही भर पडली आहे.

राहुल गांधी हे रायबरेली लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. गुरूवारी त्यांनी आपल्या मतदारसंघाचा दौरा केला. यावेळी एका कार्यक्रमात बोलताना रायबरेलीला दोन खासदार असल्याचे विधान केले. ते म्हणाले, रायबरेली हा असा मतदारसंघ आहे, बहुतेक देशातील एकमेव मतदारसंघ असावा, जिथे दोन खासदार आहेत. एक मी आणि दुसरी प्रियांका आहे.

MP Rahul Gandhi
Sanjay Raut And Sharad Pawar : "असे लोक संकुचित नसतात..." बाळासाहेबांचं नाव घेत पवारांकडून राऊतांचे कौतुक

प्रियांका गांधींचे नाव घेत राहुल यांनी मतदारसंघातील नागरिकांना भावनिक साद घातली. आपल्याप्रमाणेच प्रियांकालाही इथल्या खासदार समजावे, हा त्यांच्या म्हणण्याचा उद्देश असावा. प्रियांका या वायनाड मतदारसंघाच्या खासदार आहेत. पण रायबरेलीमध्ये त्यांनी अनेक वर्षे आई सोनिया गांधी यांच्या प्रचारात सक्रीय सहभाग घेतला आहे. हा मतदारसंघ त्यांनी पिंजून काढला आहे.

राहुल गांधी यांची ही डबल इंजिन खासदारची स्ट्रटेजी पहिल्यांदाच समोर आली आहे. ते म्हणाले, प्रियांकालाही इथे बोलवत जा. ती मला वायनाडला बोलवते आणि मीही जातो. प्रियांकाही रायबरेलीच्या खासदार आहेत. त्यामुळे त्यांनाही इथे बोलवायला हवे, शी साद राहुल गांधींनी घातली. राहुल यांच्या या विधानावर प्रियांका यांचीही प्रतिक्रिया आली.

MP Rahul Gandhi
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या व्यक्तीवर सोपवली मोठी जबाबदारी; FBIच्या संचालकपदी ​​केली नियुक्ती

प्रियांका गांधींनी सोशल मीडियात राहुल यांचा व्हिडीओ शेअर करत म्हटले आहे की, ‘रायबरेली आमचे कुटुंब आहे. कुटुंबाचा प्रत्येक आदेश मान्य.’ त्यामुळे आता प्रियांका गांधीही रायबरेलीमध्ये सक्रीय होणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, सोनिया गांधी या राजस्थानातून राज्यसभेवर निवडून गेल्या आहेत. त्यांच्या जागी रायबरेलीतून प्रियांका गांधी निवडणूक लढवतील, अशी चर्चा होती. पण राहुल यांनी वायनाड आणि रायबरेलीतून निवडणूक लढवली आणि निवडूनही आले. नंतर त्यांनी वायनाडचा राजीनामा देत प्रियांका यांच्यासाठी मतदारसंघ सोडला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com