BJP Lal krishna Advani Health Update : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवणी यांची तब्येत पुन्हा खालवल्याने त्यांना बुधवारी रात्री 9 वाजता अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. येथील डॉ. विनीत सूरी यांच्या देखरेखीत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली असून, त्यांना देखरेखीतच ठेवण्यात आलं आहे.
96 वर्षीय अडवाणी वृद्धापकाळामुळे आरोग्याशी संबंधित समस्यांना तोंड देत आहेत. याआधी 27 जून रोजी त्यांना तब्येत बिघडल्याने दिल्लीतील AIIMS रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्राप्त माहितीनुसार त्यांना वृद्धापकाळाशी संबंधित समस्यांमुळे रुग्णालयात दाखल केले गेले होते.
प्रकृती अस्वाथामुळे अडवाणी मागील अनेक दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित नसतात. नुकताच त्यांना देशाचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न देत सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कारही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अडवाणी यांच्या निवास्थानी जाऊन त्यांना दिला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा तसेच अडवाणी यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
याआधी अडवाणींना 2015मध्ये देशातील क्रमांक दोनचा सर्वात मोठा नागरी सन्मान पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. लालकृष्ण अडवाणी हे 2002 ते 2004 पर्यंत भारताचे सातवे उपपंतप्रधान म्हणून कार्यरत होते. याशिवाय ते भाजपच्या सहसंस्थापकांपैकी एक आहेत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य आहेत. तसेच 1998 ते 2004 या प्रदीर्घ काळात ते देशाचे गृहमंत्री राहिले आहेत.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.